पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २ गटांमध्ये विभागला गेला. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार शरद पवार असे २ गट पडले त्याच बरोबर पवार कुटुंबातही फुट पडल्याच चित्र पहायला मिळत आहे. राष्ट्रवादीसाठी महत्वाचा असणारा बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबात पडलेल्या फुटीचे परिणाम दिसून येतात.
अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार हे शरद पवारांसोबत जात युगेंद्र पवारांनी राजकारणात दमदार एन्ट्री केली आहे. त्यातच आता बारामतीमध्ये नवे पोस्टर्स झळकत आहेत.
बारामतीमध्ये नव्याने झळकलेल्या पोस्टर्सवरुन बारामती आणि राष्ट्रवादीमध्ये नवा ट्वीस्ट आला आहे. ‘युवकांचे प्रेरणास्थान, ना नरेंद्र ना देवेंद्र आता फक्त युगेंद्र’ अशा आशयाचे पोस्टर्स आता बारामती शहरात झळकत आहे. त्यामुळे बारामतीमधील राजकारण आता वेगळ्या वळणावर गेले असल्याचं चित्र दिसत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुणे शहरात आंबेगाव परिसरामध्ये कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांचे ‘वादा तोच पण दादा नवा’ अशा आशयाचे पोस्टर्स बारामती शहरातील विविध भागात झळकत आहेत. त्यानंतर आता युगेंद्र पवार यांच्या पोस्टर्सची राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे.
माझ्या येण्याची चर्चा एवढी होईल असं वाटलं नव्हतं. सध्याचे राजकारण चांगलं नाही. राजकारण वेगळं कुटुंब आहे पण आता हे असं व्ह्यायला नको होतं. साहेब जे सांगितील त्याचा प्रचार करणार. माझी अडचण होत आहे पण अजूनही वाटत नाही की काकी (सुनेत्रा पवार) ताईंच्या विरोधात उभ्या राहतील. सुप्रिया सुळे यांचे काम चांगले आहे. मला वाटत नाही दादांना एकटे पाडले जात आहे. मी ताई आणि दादांना काहीही सल्ला देऊ शकत नाही मी इतका मोठा नाही, असं युगेंद्र पवार म्हणाले आहेत. युगेंद्र पवार यांनी बुधवारी बारामतीमधील शरद पवार गटाचे पक्ष कार्यालयाला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.
महत्वाच्या बातम्या-
-नसांच्या दुर्लक्षित स्थितीच्या उपचारांसाठी मणिपाल हॉस्पिटल खराडीने सुरु केले ‘स्पेशलाईझ्ड क्लिनिक’
-‘पुण्यात फडणवीस किंवा कोणी वरिष्ठ नेता ही निवडणूक लढो, जिंकणार मीच’- रविंद्र धंगेकर
-पुणे ड्रग्स रॅकेट प्रकरणाचे ‘कोडवर्ड’ आले समोर; ‘लंबा बाल’, ‘मुंबई बंदर’ आणि ‘न्यू जॉब पुणे’
-सदाशिव पेठेतील जिममधील सामानाची चोरी; ७३ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी
-पुणे ड्रग्ज कनेक्शन अंडरवर्ल्ड, दुबईत?; पुण्यात बनवलेल्या ड्रग्जची थेट लंडनला विक्री