पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर पवार कुटुंबातही फूट पडलेली दिसून येते. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी काकाची साथ न देता आत्या खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचार करणार असल्याचं स्पष्ट सांगितलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे एकमेकींविरोधात निवडणुकीच्या रिंगणात दिसणार आहेत.
सुप्रिया सुळे यांच्या गटासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांना धमकावलं जातंय अशी चर्चा सध्या बारामती सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवारांनी विरोधकांना आव्हान दिलं आहे. ‘बारामतीत वेगळ्या प्रकारचं राजकारण होत आहे. बारामतीकरांनी असे दहशतीचं राजकारण कधी बघितलं नाही. कोणी तुम्हाला फोन करून धमकावले जात असेल तर थेट माझ्याशी संपर्क करा, पुढचं मी बघतो’, असं युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे.
“बारामतीत दहशतीचा आणि वेगळ्या प्रकारचे राजकारण असेल तर माझ्याशी संपर्क करा, मग मी बघतो”, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्याविरोधात सख्ख्या पुतण्यानेचं म्हणजेच युगेंद्र पवार यांनी दंड थोपटले आहेत. युगेंद्र पवारांनी खासदार सुप्रिया सुळेंच्या प्रचारार्थ गावभेट दौरे सुरु केले आहेत. उंडवडीत त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
महत्वाच्या बातम्या-
-‘गद्दारांचा पराभव करुन मीच सेनेचा खासदार’; मावळमध्ये ठाकरे गटाच्या वाघेरेंची प्रचाराला सुरवात
-कसब्यात “होय हे आम्ही केलं”चा पॅटर्न; निवडणूक लोकसभेची पण कसब्यात चर्चा ‘पोस्टर वॉर’ची
-“राष्ट्रवादीत फूट नाही आणि पवार कुटुंबातही फूट नाही; सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ