पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून भाजपच्या ९९, शिवसेनेच्या ४५ तर राष्ट्रवादीच्या ३८ जणांची उमेदवारी निश्चित झाली असून पहिल्या याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. महायुतीचे १८२ उमेदवार घोषित झाले तरीही महाविकास आघाडीकडून अद्याप एकही उमेदवार घोषित झाले नसले तरीही अनेक जागांवर उमेदवार निश्चित झाला नसल्याचे दिसत आहे. आज महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली. यामध्ये बारामतीमधून विद्यमान आमदार अजित पवार हेच पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
बारामतीमधून अजित पवार यांच्याविरोधात या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून कोण मैदानात उतरवणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. बारामतीमधून महाविकास आघाडीकडून अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे बारामतीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार हे निश्चित आहे. मात्र, उमेदवार नेमका कोण यावर अद्याप शिक्कामोर्तब झालं नाही. याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुतोवाच केले आहे.
“बारामतीमधून युगेंद्र पवार हेच उमेदवार असतील, असे मला वाटते. माझ्या विरोधात कोणीतरी उभा राहणारच आहे. पवार साहेब माझे दैवत आहे. आज संध्याकाळपर्यंत जागांचा तिढा सुटणार आहे. पत्रकार परिषद आज होणार असून मात्र वेळ ठरली नाही”, असे म्हणत आव्हाडांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत वक्तव्य केलं आहे.
दरम्यान, बारामतीमधून अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार हेच उमेदवार असतील असे आव्हाडांनी सांगितले आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून युगेंद्र पवारांनी उमेदवारी मिळाली तर बारामतीत काका विरुद्ध पुतण्या असा सामना अवघा महाराष्ट्र पाहणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-दत्तात्रय भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील? इंदापूरात तिसऱ्यांदा होणार काँटे की टक्कर!
-राष्ट्रवादीने जाहीर केला हडपसरचा उमेदवार; शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी? भानगिरे उद्या घेणार मेळावा
-Assembly Election: राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; टिंगरेंचा पत्ता कट? मुळीकांच्या आशा पल्लवीत
-अजितदादांची राष्ट्रवादी तर सोडली, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणं उमेश पाटलांसाठी अडचणीच
-जगताप प्रचाराला लागले, तरीही महाविकास आघाडीचा उमेदवार ठरेना