पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराचा धूमधडाका सुरु आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ गुरुवारी तरुणांनी बाईक रॅली काढून झंझावती प्रचार केला होता. ही बाईक रॅली कोथरुड विधानसभा मतदरासंघातून काढण्यात आली. यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांशी आणि नागरिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
‘बाईक रॅलीमध्ये सहभागी होताना महाविद्यालयीन काळातला जल्लोष पुन्हा अनुभवला. साऱ्या तरुणांसोबत जाताना नव्याने मिळालेली अखंड ऊर्जा भविष्यात कितीतरी काळ पुरेल इतकी आहे’, असे मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत. कोथरुड विधानसभा मतदारसंघात काढण्यात आलेल्या या बाइक रॅलीत ठिकठिकाणी नागरिक उत्स्फूर्तपणे हात उंचावून साद घालीत होते. त्यांना मुरलीधर मोहोळ यांनी अभिवादन करुन आवर्जून मतदान करण्याची साद घातली.
भेलकेनगर पासून सुरू झालेली ही रॅली गुजरात कॉलनी, आझाद नगर, शास्त्रीनगर, सागर कॉलनी, हमराज, परमहंस नगर, पेठकर साम्राज्य, सुतारदरा, जय भवानीनगर, रामबाग, कानिफनाथ मंडळ, साई मित्रमंडळ, मोरे विद्यालय चौक, हनुमाननगर, एआरआय रोड, श्रीराम चौक, विश्वशांती चौक, किशोर विटेकर चौकमार्गे गेली व मेगा सिटीजवळ तिचा समारोप करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या-
-पूजा सावंतच्या ऑस्ट्रेलियाच्या घरात छत्रपती शिवाजी महाराज झाले विराजमान
-“अजितदादांच्या कामाचा आवाका अन् पद्धत संपूर्ण महाराष्ट्राला माहिती”- सुनेत्रा पवार
-“कधी कधी वाटतं २००४ मध्येच हे करायला पाहिजे होतं”; इंदापूरच्या सभेत अजित पवारांचं वक्तव्यं
-‘कोणी तुमचा ऊस नेला नाही तर हाय पठ्ठ्या ऊस न्यायला, अन् भाव पण चांगला देईल’- अजित पवार