Madhuri Dixit Nene : बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दिक्षित नेने गेल्या कित्येक वर्षांपासून बॉलिवूड क्षेत्रात आपलं नाव गाजवत आहे. माधुरी दिक्षितच्या घायाळ करणाऱ्या अदांमुळे, दमदार अभिनय आणि माधुरीच्या जबरदस्त नृत्याने माधुरी आजही प्रसिद्धच आहे. माधुरी दिक्षितचा चाहतावर्ग काही कमी नाहिये. आजही माधुरी कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चत असतेच. माधुरीच्या धकधक ची एक झलक पाहण्यासाठी आजही चाहते आतुर असतात. माधुरीने आतापर्यंत ७० पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केले आहे.
माधुरी आताच्या नविन सिनेमांमध्ये देखील अभिनय, नृत्य करताना दिसते. त्यासोबतच माधुरी डान्सिंग रिएलिटी शो मध्येदेखील परिक्षक म्हणून काम करत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून माधुरी दीक्षित चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. पण अभिनेत्री आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. “ब्लाउज काढून तुझी ब्रा दाखवायला हवीस”, अशी एका सीनसाठी दिग्दर्शकाने माधुरीकडे मागणी केली होती.
हिंदी सिनेसृष्टीतील सिने-दिग्दर्शक टीनू आनंद यांनी नुकतचं रेडिओ नशाला दिलेल्या मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला आहे की, ‘शनाख्त’ हा चित्रपट कधीही रिलीज झाला नाही. पण या चित्रपटात माधुरी दीक्षित बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसून आली होती. ‘शूटिंगच्या पहिल्या दिवशीच ब्लाउज काढून ब्रा दाखवायला हवी’, अशी मागणी दिग्दर्शकाने माधुरीकडे केली होती. सुरुवातीला या सीनसाठी माधुरीने आपला होकार कळवला होता. पण नंतर तिने नकार दिला, असं टीनू आनंद यांनी सांगितलं आहे.
“माधुरीला मी संपूर्ण सीन समजावला होता. त्यावेळीच मी या सीनसाठी तिला ब्लाउज काढावा लागेल आणि ब्रा दाखवावी लागेल, असं सांगितलं होतं. तिने ब्रा दाखवावी, अशी त्या सीनचीच मागणी होती. त्यामुळे शूटिंगच्या पहिल्या दिवशीच मी हा सीन ठेवला होता. त्यावेळी माधुरीने या सीनसाठी आपला होकार कळवला होता. तिने तिच्या ब्राचं डिझाईन स्वत: करावं, असं मी तिला सांगितलं होतं”. माधुरीने सुरुवातीला होकार दिला. पण शूटिंगच्यावेळी तिने स्पष्ट नकार दिला. माधुरीने चित्रपटासाठी नकार दिल्याने दिग्दर्शकाने तिला बाहेरचा रस्ता दाखवला. पुढे या चित्रपटाचं काहीही झालं नाही”, असं टीनू आनंद यांनीच सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-सावधान!! उन्हाळ्यात सतत फोन हिट होऊन बंद पडत आहे का? मग, वापरा या टिप्स, अन्यथा…
-Voting Day | मतदानाच्या दिवशी पुणे जिल्ह्यातील बाजार बंद; पहा काय काय मिळणार?
-श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त वाचा महत्वाचे उपदेश; जीवनात येणार नाहीत समस्या