बारामती : राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज पार पडत आहे. देशातील सर्वात हॉटस्पॉट असलेल्या बारामती लोकसभेचे देखील आज मतदान आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या काटेवाडीमध्ये मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी मुख्य लढत आहे. पवार कुटुंबातील दोन सदस्यांच्या या लढाईमध्ये अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी ‘अजित पवारांना ४ जूननंतर मिशा काढाव्या लागतील’, असं वक्तव्य श्रीनिवास पवार यांनी केले होते. त्यावर आता काटेवाडीत मतदान केल्यानंतर अजित पवारांनी श्रीनिवास पवारांना उत्तर दिलं आहे.
“त्याने १० वर्षापूर्वी मिशी काढली आता माझी मिशी काढायची वाट बघतोय, आणखी काय काय वाट बघतोय हे मला बघायचंय. अरे बाबा तूच वस्तरा घेऊन ये आणि काढ मिशा”, असं म्हणत त्यांनी श्रीनिवास पवारांना अजित पवारांनी सणसणीत टोला दिला आहे. त्यावेळी त्यांनी सगळ्या आरोपांना उत्तर दिले आहे. “आमच्या समोरच्या लोकांनी कुटुंब एकत्र असल्याचे दाखवले. माझी आई सगळ्यात जेष्ठ आहे. माझी आई माझ्याबरोबर आहे. माझी आई कोल्हापूरला होती. माझ्या आत्याच्या मुलाचे लग्न होते. मला तिने सांगितले होते की, मी मतदानाला तुझ्यासोबत येईल. माझी आई माझ्याबरोबर आहे. मेरी मॉ मेरे साथ है! आमचे कुटुंब फार मोठं आहे. आमच्या विरोधात फक्त तीन कुटुंब आहेत, बाकी कुणी माझ्याविरोधात नव्हते”, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.
“आमच्या समोरच्या लोकांनी कुटुंब माझ्या विरोधात असं दाखवण्याचा प्रयत्न केला. आमच्या कुटुंबात सगळ्यात ज्येष्ठ माझे वडील अनंतराव पवार होते. आज माझी आई माझ्या बरोबर आहे. याची नोंद सगळ्यांनी घ्यावी. आज आम्ही मतदान केलं. महायुतीचा उमेदवार यावा या दृष्टीने प्रचार केला होता. आरोपांचा धुरळा माझ्या विरोधात उठवला आहे. मी मात्र या आरोपांकडे लक्ष दिलेलं नाही. माझ्या शेवटच्या सभेपर्यंत बारामतीकरांनी चांगला प्रतिसाद दिला”, असं अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावणार’; मुरलीधर मोहोळांचा पुणेकरांना शब्द
-मुरलीधर मोहोळांसाठी राज ठाकरेंची पुण्यात जाहीर सभा; ‘या’ तारखेला ‘राज’ आवाज घुमणार
-“त्यांना तर राहुल गांधी यांच्या समोरच मुजरा करायचाय”; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
-‘ब्लाउज काढून तुझी ब्रा दाखवायला हवीस’; दिग्दर्शकाच्या मागणीनंतर माधुरीने काय उत्तर दिले, वाचा…