पुणे : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गोविंदगिरी महाराजांनी रविवारी आळंदीमध्ये बोलत असताना ‘समर्थ रामदास स्वामी’ हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचा दावा केला होता. त्यांनी केलेल्या या दाव्यावर प्रशांत महाराज मोरे देहूकर यांनी निषेध व्यक्त केला आहे. प्रशांत महाराज हे संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज आहेत.
“समर्थ रामदास स्वामी नव्हे तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते”, असा दावा करत प्रशांत महाराज मोरे यांनी योगी आत्यनाथ आणि गोविंदगिरी महाराजांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते, असा प्रतिदावा प्रशांत महाराज मोरेंनी केला. त्यांनी यासाठी एका अभंगाचा दाखला देखील दिला. “प्रशांत महाराज मोरे देहूकरांची ही वैयक्तिक भूमिका आहे”, असं संत तुकाराम महाराजांच्या संस्थानकडून स्पष्ट करण्यात आलंय. मात्र देवस्थानने अद्याप त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही.
“महाराष्ट्रात एकाच कुटुंबात चार संत होऊन गेले. त्यांचा आशीर्वाद आपल्याला शेकडो वर्षांपासून मिळतो आहे. याच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांना रामदास स्वामी यांनी घडवलं. त्यांनी औरंगजेबच्या सत्तेला आव्हान दिले. औरंगजेबला असे मारले की आजपर्यंत औरंगजेबला कोणी विचारलं नाही. महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी आहे. कारण इथं संतांचं सान्निध्य आहे. याच महाराष्ट्रात येऊन आज सगळ्या संतांचं दर्शन मला घेता येत आहे आणि शिवरायाच्या पराक्रमाने पावन झालेली भूमी मला पाहता आली”, असं योगी आदित्यनाथ म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात भाजपचे इव्हेंट वॉर; इच्छुक उमेदवार सुनिल देवधर मात्र एकाकी
-टिईटी घोटाळ्यातील आरोपीचे एक कोटिचे दागिने न्यायालयाकडून परत!!
-सुनेत्रा पवार यांच्या बॅनरवर शाईफेक; सुप्रिया सुळे म्हणाल्या…
-अयोध्येतील राम मंदिरानंतर लवकरच मथुरेत श्रीकृष्ण मंदीर; फडणवीसांचा विश्वास
-‘आधी साधी विचारपूस पण केली नव्हती आता मात्र…’; अजित पवारांची बोचरी टीका