पुणे : बारामती लोकसभा निवडणुकीत भावनिक राजकारण पहायला मिळालं तसेच भावनिक राजकारण आता विधानसभा निवडणुकीतही पहायला मिळत आहे. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी बारामती विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी कन्हेरीमध्ये पहिली प्रचारसभा घेतली. यावेळी अजित पवारांना कौंटुंबिक मुद्द्यांवर बोलताना अश्रू अनावर झाले होते. त्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. युगेंद्र पवारांच्या प्रचारसभेत बोलताना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांची नक्कल केल्याचे पहायला मिळाले आहे.
‘एकोपा रहायला पिढ्यानं-पिढ्या जातात, पण नातं तुटायला वेळ लागत नाही,’ असे सांगत बारामतीत भाषण करताना अजित पवार काल भावूक झाले होते. त्यांच्या भाषणाचा संदर्भ घेत आज शरद पवार यांनी त्यांच्या भाषणांची नक्कल केली आहे. त्यानंतर उपस्थितांनी घोषणा दिल्या. अजित पवार सभेत भावूक झाले तेव्हा त्यांनी पाणी पिऊन डोळे पुसले होते. शरद पवारांनी आज भाषण करताना डोळे पुसून अजित पवारांची खिल्ली उडवली आहे. तसेच ‘शरद पवारांनीच तातासाहेबांचं घरं फोडलं का?’ असा सवाल करत अजित पवारांनी शरद पवारांवर गंभीर आरोपच केला. याचा देखील आज या सभेतून समाचार घेतल्याचे पहायला मिळाले आहे.
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणी काढला? आपण काढला. निवडणूक चिन्ह कोणाचं? आपलं. परंतु, एके दिवशी काही लोकांनी थेट आमच्यावर खटला दाखल केला. मी माझ्या आयुष्यात कधी न्यायालयासमोर उभा राहिलो नव्हतो. परंतु, काही लोकांनी आमच्यावर खटला दाखल करून आम्हाला न्यायालयासमोर उभं केलं. या पक्षाचे मालक आम्ही आहोत. ते निवडणूक चिन्ह देखील त्यांचं नाही आमचं आहे”, असंही शरद पवारांनी ठणकावून सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शंकर जगतापांची राहुल कलाटेंवर टीका; ‘शरद पवारांचा कार्यकर्ता जरी असता तरी…’
-बालवडकरांची तलवार म्यान! चंद्रकांत पाटलांना पाठिंबा दिला अन् पेढाही भरवला