पुणे : कल्याणीनगरमद्ये झालेल्या अपघातानंतर सर्व क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. यावरुन राजकीय नेते एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत आहेत. अपघातानंतर हे प्रकरण येरवडा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतर मध्यरात्रीच वडगाव शेरीचे अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे पोहोचले होते. सुनील टिंगरे थेट मध्यरात्रीच तत्परनेने पोहोचल्याने टिंगरे यांच्यावर या प्रकरणातील सहभागावरून सातत्याने आरोप होत आहेत. अनेक आरोपांनंतर टिंगरे यांनी पोलीस स्टेशनमध्ये गेल्याचे मान्य केले होते.
आमदार सुनील टिंगरे हे पोलीस स्टेशनमध्ये गेले मात्र, कोणत्याही प्रकारे पोलीस कारवाईमध्ये हस्तक्षेप केला नसल्याचा दावा केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली आहे. त्याचबरोबर अग्रवाल प्रकरणात तपासाची अपडेट दिली. यावेळी आमदार सुनील टिंगरे मध्यरात्री पोलिस स्टेशनला आल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले आहे.
“होय, येरवडा पोलीस स्टेशनमध्ये मध्यरात्री सुनील टिंगरे आले होते. मात्र, पोलिसांचे कारवाई ही मुद्द्यानेच झाली आहे. त्यामुळे टिंगरे पोलिस स्टेशनला आले असले, तरी तपासाची दिशा बदलली हे संयुक्तिक नाही”, असे अमितेश कुमार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘..म्हणून आरोपी वेदांत अग्रवालच्या रक्तचाचणी अहवाल महत्त्वाचा नाही’; अमितेश कुमार असं का म्हणाले?
-“करके बैठा मै नशे, इन माय पोर्शे…”; आरोपी वेदांत अग्रवाल रॅप करत देतोय शिव्या अन् आई म्हणतेय…
-‘पैसे खाल्ल्याशिवाय ‘हे’ होऊच शकत नाही’; रवींद्र धंगेकरांचा पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप
-पुणेकरांनो सावधान! येत्या २ दिवसांत पुन्हा उन्हाचा कडाका वाढणार, हवामान विभागाचा अंदाज