पुणे : सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यातच इन्स्टाग्रामवर तब्बल १.३ मिलियन फॉलोअर्स असलेली एक सोशल मीडिया ‘इन्ल्फूएन्सर’ गेल्या काही दिवसांपासू गायब आहे. मयुरी चैतन्य मोडक-पवार हिचा (वय २६, रा. सदाशिव पेठ) असे गायब झालेल्या तरुणीचे नाव आहे.
सोशल मीडियावर मुयरी मोडक ही X-mau या नावाने प्रसिद्ध आहे. मयुरी १५ जूनपासून घरामधून निघून गेली आहे. ती घरातच ‘नोट’ लिहून ठेवत कोणाला काहीही न सांगता निघून गेली. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात ‘मिसिंग’ची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मयुरीचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुरी पवार ही सोशल मिडीया ‘इन्ल्फूएन्सर’ आहे. तिला सोशल मिडियावर ‘माऊ’ या नावाने ओळखतात.
मयुरीला वडील नाहीत. ती आईसोबत राहत होती. तिने तिच्या सोशल मीडिया करियरची सुरुवात ‘टिक टॉक’वरुन सुरू केली त्यानंतर इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही मयुरी प्रसिद्ध झाली. ‘टिक टॉक’वर मयुरीला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. तिचे लाखो फॉलोअर्स तयार झाले होते. मात्र, केंद्र सरकारने टिक टॉकवर बंदी घातली. त्यानंतर, ती इन्स्टाग्रामवर सक्रिय झाली. इन्स्टाग्रामवर तिचे तब्बल १.३ मिलियन फॉलोअर्स आहेत. तिने ‘दुर्गा ग्रुप’ नावाने संस्था स्थापन केलेली असून याद्वारे ती कपड्यांचा व्यवसाय करते.
महत्वाच्या बातम्या-
-लोकसभा पराभवानंतर RSS इन ॲक्शन मोड; ‘मोतीबागेत’ नेत्यांची परेड; नेमकं घडतंय काय?
-अजित पवार गटाचे आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक; मंत्रिमंडळात स्थान मिळणार का?
-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक; असा ठरला जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
-राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; आंब्यांच्या पेट्यांमधून विदेशी मद्य जप्त
-शिंदेंच्या शिवसेनेला पुण्यात हव्यात ३ जागा, भाजप आणि राष्ट्रवादीच्या ‘या’ मतदारसंघांवर दावा