नवी दिल्ली | जगन्नाथ मंदिर पुरी : ओडिसामधील जगन्नाथ मंदिरामधील रत्न भांडार उघडण्यात आले आहे. तब्बल ४६ वर्षांनी ओडिसा सरकारकडून भगवान जगन्नाथ मंदिरातील रत्न भांडार उघडण्यात आले आहे. या भांडारामध्ये असलेल्या दागिन्यांची आणि किंमती वस्तूंची यादी बनवण्यासाठी हे भांडार उघडण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.
रविवारी दुपारी १ वाजून २८ मिनिटांनी हे भांडार उघडण्याचा मुहूर्त होता. त्या मुहूर्तावरच हे भांडार उघडले गेले. यापूर्वी सर्व टीम तैनात झाल्या होत्या. साप पकडणारे सर्पमित्र, पोलीस प्रशासन, राज्य सरकार, मंदिर प्रशासनाचे पदाधिकारी असे सर्व जण जगन्नाथ मंदिराजवळ पोहचले होते. हे भांडार उघडण्यापूर्वी मंदिर कमिटीची बैठक झाली होती. त्यामध्ये कमिटीचे चेअरमन जस्टीस विश्वनाथन रथ यांना ओडिसा राज्य सरकारने रत्न भांडार उघडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या भांडाराला उघडण्यापूर्वी जगन्नाथ मंदिरामध्ये विशेष यज्ञ देखील करण्यात आला होता.
यापूर्वी या भांडाराला १९७८ साली उघडण्यात आले होते. त्यानंतर आता ओडिसा राज्य सरकारने या भांडारामध्ये असलेल्या किंमती वस्तू आणि दागिन्यांची यादी तयार करण्यासाठी देखील एक समिती स्थापन केली आहे. हे भांडार उघडण्यासाठी विशेष मुहूर्त पाहण्यात आला होता आणि त्याच मुहूर्तावर हे भांडार उघडले असल्याचे विश्वनाथन रथ यांनी सांगितले आहे. या भांडारामध्ये १२८.३८ किलो सोने, २२१. ५३ किलो चांदी, तर अनेक विशेष किमती सामान या रत्न भांडारामध्ये आहे.
महत्वाच्या बातम्या-
-कौतुकास्पद! पतीच्या निधनानंतर भाजी विकून मुलाला शिकवलं अन् लेकानंही आईच्या कष्टाचं पांग फेडलं
-वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: आता वारकऱ्यांनाही मिळणार पेन्शन; राज्य सरकारची मोठी घोषणा
-अजित पवारांच्या लाडकी बहिण योजनेबाबतच ‘ते’ वक्तव्य ठरु शकतं विधानसभेसाठी धोक्याचं!
-महाराष्ट्र सरकार उचलणार तीर्थ दर्शनाचा खर्च; ज्येष्ठांसाठी काढली ‘ही’ नवी योजना
-पुणेकरांनो काळजी घ्या! झिका व्हायरस पसरतोय, डेंग्यूची रुग्णसंख्याही झपाट्याने वाढतेय