पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवारांनी भाजपसोबत हातमिळवणी केली आणि राष्ट्रवादीला सुरुंग लावला. त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार हे पुन्हा एकत्र येतील अशी राजकीय वर्तुळात अनेकदा चर्चा होत आहे. लोकसभा निवडणूक ही पवार कुटुंबाने एकमेकांविरोधात लढली पण आता विधानसभेला एकत्र येण्याच्या चर्चेवर आज पुण्यात शरद पवारांनी उत्तर दिले आहे.
शरद पवार काय म्हणाले?
“निवडणुका येतात आणि जातात. कुटुंब कायम राहतं. घरामध्ये सगळ्यांना जागा आहे. मात्र, पक्षांमध्ये जागा आहे की नाही हा व्यक्तिगत निर्णय मी घेणार नाही. माझे सगळे सहकारी संघर्षाच्या काळामध्ये मजबुतीने उभे राहिले त्यांना पहिल्यांदा विचारेन. पण सहकारी मंडळी तयार झाले तर..” असे म्हणत शरद पवारांनी अजित पवारांना पक्षात पुन्हा घेण्याचा निर्णय एकटा घेणार नसल्याचे सांगितले आहे.
पत्रकारांनी शरद पवारांना अजित पवारांनी बारामतीमध्ये विकास केला, तरी बारामतीमध्ये लोकांनी तुम्हाला का निवडलं? असा प्रश्न विचारताच शरद पवार म्हणाले, ‘अरे ती बारामती आहे. लोकांशी वैयक्तिक संबंध ठेवले पाहिजेत. याआधी मी फक्त शेवटची सभा घ्यायचो. मी ५० टक्के लोकांना नावाने ओळखायचो, पण आता जुनी लोकं नाहीत. मला खात्री होती की लोक सुप्रियाला निवडून देतील’, असेही सांगत शरद पवारांनी बारामतीमध्ये लोकसभेला मिळालेल्या यशाचं नेमकं कारण सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शिक्षण संस्थांनी मुलींना प्रवेश नाकारला तर….; चंद्रकांत पाटलांचा शिक्षण संस्थांना इशारा
-विठु माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मुर्ती विठ्ठलाची; आषाढी एकादशीचे महत्व तुम्हाला माहिती आहे का?
-पुण्यात चाललंय तरी काय? दोन अल्पवयीन मुली दारु पिल्या, झिंगल्या अन् दारुच्या नशेत…