पुणे : स्वर्गीय दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने पुणे शहरात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु आहे. सर्व सरकारी सुविधा उपलब्ध असणारे हे रुग्णालय रुग्णांकडून लाखोंचं बील आकारत असतात. अशातच गेल्या २ दिवसांपासून हे रुग्णालय पुन्हा चर्चेत आले आहे. आज भाजपचे आमदार अमित गोरखे यांच्या कार्यालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृत तनिषा भिसे या महिलेच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी रुग्णालय प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत.
‘दीनानाथ मंगेशकर हे रुग्णालय लतादीदी आणि मंगेशकर परिवाराने खूप मेहनतीने उभारले आहे. हे रुग्णालय अत्यंत नावाजलेले आहे. या रुग्णालयात अनेक शस्त्रक्रिया आणि उपचार होतात. या रुग्णालयातील सगळ्याच गोष्टी चूक आहेत, असे म्हणता येणार नाही. कालचा प्रकार हा असंवेदनशील होता. जिथे चूक आहे, तिथे चूक म्हणावं लागेल’, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे प्रशासन आणि विश्वस्त मंडळाचे चांगलेच कान टोचल्याचे पहायला मिळाले आहे.
‘दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला त्यांची चूक सुधारावी लागेल. ते ही चूक सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असतील, तर आम्हाला आनंद आहे. जोपर्यंत मी नेमलेल्या समितीचा अहवाल येत नाही, तोपर्यंत याप्रकरणावर बोलणे योग्य ठरणार नाही. मात्र, रुग्णालयाबाहेर आंदोलन करणे योग्य नाही. सरकारने या घटनेची दखल घेतली आहे. दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल. पण शो बाजी बंद झाली पाहिजे. घैसास यांच्या रुग्णालयाची झालेली तोडफोड समर्थनीय नाही. त्यामध्ये भाजपची महिला आघाडी सहभागी असेल तरी हे कृत्य चूक आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-आधी चिल्लर फेकली आता शेण फासणार; दीनानाथ रुग्णालयाविरोधात आंदोलक आक्रमक
-रुग्णांकडून लाखोंचे बिल घेणाऱ्या दीनानाथ हॉस्पिटलने थकवली कोट्यवधीचा कर, नेमका आकडा किती?
-‘डॉक्टरांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा’, म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चिल्लर फेक
-निष्पाप जीव गेल्यानंतर दीनानाथ हॉस्पिटलला उपरती, रुग्णांसाठी घेतला मोठा निर्णय