पुणे : राज्यातील विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी येत्या २७ मार्चला होत असलेल्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधील इच्छुक पक्षश्रेष्ठींकडे साद घातलाना दिसत आहे. विधान परिषदेच्या ५ जागांपैकी ३ भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रत्येकी १ असे ठरले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पुण्यातील नेते आग्रही होते. पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी यासाठी जोरदार तयारी केली होती. मात्र, अजित पवारांनी मानकरांना डावलून अमरावतीच्या संजय खोडके यांना उमेदवारी दिली आहे.
पिंपरी चिंचवडचे नाना काटे देखील इच्छुक होते, विधानसभा निवडणुकीवेळी भाजप उमेदवार शंकर जगताप यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सांगण्यावरून माघार घेतली होती, मात्र आता आपल्याला विधान परिषदेवर संधी मिळावी, अशी इच्छा नाना काटे यांनी व्यक्त केली होती. मात्र नाना काटे आताही डावललं गेल्याचे दिसून आलं आहे.
अजित पवारांकडून पुन्हा एकदा दीपक मानकर यांना विधान परिषदेवर डावलले गेल्याने आता पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे दिसत आहे. या आधी मानकर यांना वारंवार डावलले गेल्याने पक्ष सोडण्याच्या तयारीत होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा डावलल्यानंतर दीपक मानकर काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
कोण आहेत संजय खोडके?
संजय खोडके हे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय असून काही काळ त्यांनी अजित पवारांचे स्वीय सहाय्यक म्हणून कामही केल्याचे बोलले जाते. संजय खोडके यांच्या पत्नी सुलभा खोडके या देखील राजकारणात सक्रीय असून त्या अमरावती शहर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘बरं झालं पक्ष फुटला, अशा पुरुषासोबत मी काम करु शकत नाही’; सुप्रिया सुळेंच्या भाषणाची क्लिप व्हायरल
-‘महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती’, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आक्रमक
-स्वारगेट बस अत्याचारानंतर अखेर एसटी महामंडळाला आली जाग; ‘त्या’ बसचा होणार भंगारात लिलाव