पुणे : पुणे शहरात कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातावरुन सध्या दररोज नवनविन खुलासे केले जात आहेत. या सर्व प्रकरणामध्ये राजकीय दबाव असल्याचा आरोपही झाला. पोलिसांनी पैसे खाल्याचा देखील आरोप झाला. यावर आता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहे. सुरुवातीला ३०४ अ कलम लावून एफआयआरची नोंद केली होती. मात्र या प्रकरणाची माहिती घेऊन दुपारी आम्ही ३०४ कलम वाढवण्यात आले. हे सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याचे कलम आहे. हा एकच एफआयआर आहे, दोन नाही, असे स्पष्टीकरण अमितेश कुमार यांनी दिले आहे.
दोनवेळा एफआयआर दाखल का केली?
“शनिवारी रात्री घटना अडीचच्या सुमारास घडली. त्यानंतर आठच्या सुमरास ३०४ अ चा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात घटनाक्रम घडल्यानंतर त्यानंतर त्याच दिवशी ३०४ कलम वाढवण्यात आला. त्याच दिवशी बालहक्क मंडळाकडे अर्ज केला. त्यानंतर हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे मुलगा सुज्ञान असल्याचे समोर येत नाही. तोपर्यंत त्याला बालसुधारगृहात ठेवण्यात यावे अशी मागणी केली होती. दोन्ही तक्रारी फेटाळण्यात आले होते. त्यानंतर आम्ही हायर कोर्टात अपील केले होते. त्यावेळी आम्ही पब मालक आणि अल्पवयीन मुलाचे वडिल विशाल अग्रवालवर गुन्हा दाखल केला होता. ज्युवेनाईल जस्टीसकडे पुन्हा गेल्यावर आता १४ दिवसांसाठी कोठडी देण्यात आली आहे.”
आरोपीला पिझ्झा का दिला गेला?
“आरोपीच्या पालकाने अल्पवयीन मुलाला गाडी चालवण्यास दिली, याचाही तपास सुरू असून या प्रकरणात कारवाई करण्यास दिरंगाई झाली किंवा कोणी मॅनेज झाले, असा काही आरोप होत आहे. मात्र, आम्ही यावर सांगतो की, अशा प्रकारच्या घटनांमध्ये कायद्याच्या मार्गावर पोलीस चालत आहेत. यामध्ये दिरंगाई झाली किंवा कोणी मॅनेज झाले असे म्हणणे योग्य नाही. आता सुरुवातीला ३०४ कलम का लावण्यात आले नाही, तसेच आरोपीला पिझ्झा खाण्यासाठी दिला का? याबाबत चौकशी सुरू आहे”, असेही पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘हो, त्या रात्री आमदार टिंगरे पोलीस स्टेशनमध्ये आले होते, पण…’; अमितेश कुमार यांनी दिली माहिती
-‘..म्हणून आरोपी वेदांत अग्रवालच्या रक्तचाचणी अहवाल महत्त्वाचा नाही’; अमितेश कुमार असं का म्हणाले?
-“करके बैठा मै नशे, इन माय पोर्शे…”; आरोपी वेदांत अग्रवाल रॅप करत देतोय शिव्या अन् आई म्हणतेय…
-‘पैसे खाल्ल्याशिवाय ‘हे’ होऊच शकत नाही’; रवींद्र धंगेकरांचा पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप