पुणे : लोकसभा निवडणुकीत भाजपने ‘४०० चे पार’चा नारा दिला होता. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला जाहीर झाला आणि भाजपचा नारा फेल झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपला या नाऱ्याचा मोठा फटका बसला असून २०१९ मध्ये भाजपला मिळालेल्या जागांपेक्षा या लोकसभेत देशातील ६० पेक्षा जास्त जागा कमी झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक ठिकांणी सभांचा धडाका लावला होता.
शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीचा परिणाम आपण पाहिला आहे, असे वक्तव्य एनडीएचा भाग असणाऱ्याच आरपी आयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले आहेत. महाष्ट्रात एनडीएचा पराभव का झाला? यावर बोलताना रामदास आठवलेंनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे वक्तव केले आहे.
नेमकं काय म्हणाले रामदास आठवले?
“अजित पवार आमच्याकडे आले होते. जनतेने त्यांना नाकारले आहे. एकनाथ शिंदे यांनी ७ जागा जिंकल्या आहेत. धनुष्यबाण असेलली खरी शिवसेना आहे. महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये निवडणुका येत आहेत. आम्ही जिंकू. यावेळी जागावाटपात विलंब झाला. आम्हाला जागा मिळायला हव्या होत्या. विधानसभा निवडणुकीत आम्ही जिंकू महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल.”
जनतेच्या इच्छेनुसार निकाल लागले आहेत. एनडीएला पूर्ण बहुमत मिळाले आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. एनडीएचे सरकार स्थापन होईल. जेडीयू आणि टीडीपी आमच्यासोबत आहेत. नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू आमच्यासोबत असतील. एनडीएचे मित्र आमच्यासोबत राहतील. असेही रामदास आठवले म्हणाले आहेत.
एनडीए ४०० पर्यंत जाणार असा विश्वास भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केला होता. मात्र एनडीएचे ३०० उमेदवार निवडणून आले नाहीत. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांवर झालेल्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युतीला मोठा धक्का बसला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मोहोळांनी गुलाल उधळला मात्र भाजपचे दोन आमदार ‘डेंजर झोन’मध्ये, गणित नेमकं कुठं फसलं?
-मुळशीचा स्वाभिमान, अभिमान पुणेकरांनी दिल्लीला पाठवला; मोहोळांच्या विजयावर मित्राची प्रतिक्रिया
-पुणे जिल्ह्यात महाविकास-महायुतीमध्ये टाय; प्रत्येकी 2 जागांवर उमेदवार विजयी
-सोशल मीडियावर अजित पवारांचा ट्रेंड; ‘ते’ व्हिडीओ शेअर करत नेटकरी विचारतात,’आता मिशी…’
-Maval : बारणेंनी मावळची जागा राखली; किती मतांनी मिळवला विजय?