पुणे : पुणे शहरातील कल्यणीनगर भागात झालेल्या अपघातामुळे राज्यात अनेक चर्चा रंगल्या आहेत. या प्रकरणाबाबत रोज नवे खुलासे होत आहेत. या प्रकरणाला राजकीय वळण असल्याने सर्व स्तरामधून सत्ताधारी आणि पोलीस प्रशासनावर टीकेची झोड उठवली जात आहे. हा अपघात झाल्यानंतर या प्रकरणामध्ये सुरवातीला पोलिसांवर दबाव आणत आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही पुणे पोलिसांना का फोन केला? असा सवाल विचारत संशय घेण्यात आला. यावर आता अजित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये उत्तर दिले आहे.
‘मला कोणाकडूनही माहिती मिळाली की, दादा इथे इथे अशी घटना घडली आणि तुम्ही पालकमंत्री असलेल्या भागात घडली आहे. तर आम्हाला ती बातमी मिळाल्यानंतर पुणे शहरातील असेल तर पुणे आयुक्तांना सांगतो. पिंपरी-चिंचवडमधील असेल तर त्या आयुक्तांना सांगतो कारण ते प्रमुख आहेत. यासंदर्भात शिपायाला, पीआय, एपीआयला सांगत बसत नाही’, असे अजित पवार म्हणाले आहेत.
‘मी अशा प्रकारच्या कोणत्याही घटना घडल्यानंतर दोषींना पाठिशी घाला असं चुकूनही माझ्या तोंडून येणार नाही. याउलट कधी कधी मी म्हणतो, तिथं अजित पवार दोषी असेल तर माझ्यावर कारवाई करा, हे माझे शब्द असतात नेहमी. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नका. मोठ्या घरातील मुलगा आहे. अर्थिक प्रलोभन दाखवण्याचा प्रकार घडू शकतो. कोणीही याला बळी पडणार नाही याची खबरदारी पोलीस आयुक्त म्हणून तुम्ही घ्या असे मी त्यांनी सांगितले’, असे म्हणत अजित पवारांनी स्पष्टोक्ती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे अपघात प्रकरणाला वेगळं वळण; ‘त्या’ आमदाराच्या फोननंतर आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलले?
-‘एक बोट दुसऱ्याकडे दाखवता तेव्हा ४ बोटं तुमच्याकडे वळतात’; शिंदे गटाचे धंगेकर, अंधारेंना खडेबोल
-‘…तर मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा’; अंजली दमानियांची मागणी
-धक्कादायक! पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात ७५० ग्रॅम गांजा; काय आहे नेमका हा प्रकार?