गुढीपाडवा : मराठी नववर्षातील चैत्र महिन्यातील पहिला सण म्हणजे ‘गुढीपाडवा’. हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जाणारा मुहूर्त म्हणजे गुढीपाडव्याचा. त्यामुळे या सणाचं महत्व अधिक महत्व आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. हा सण हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे या दिवशी अनेक जण सोन्याच्या खरेदीला किंवा नवीन वस्तूंंच्या खरेदीला प्राधान्य देतात. ९ एप्रिल २०२४ रोजी यंदाचा गुढीपाडव्याचा सण आहे.
महाराष्ट्रात विशेषत: गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो. याच दिवशी सृष्टीची निर्मिती झाली असल्याचं मानलं जातं. मराठी नवववर्षाच्या सुरवातीचा हा पहिला सण असल्यामुळे हिंदू धर्मात या सणाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाला आहे. या दिवशी ब्रह्मदेवाची, विष्णू देवाची पूजा केली जाते. गुढीपाडव्याचा सण साजरा करताना विजयाचे प्रतिक म्हणून या दिवशी घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. या गुढी उभारण्यामागे पौराणिक कथा दडली आहे.
गुढी उभारण्यामागचं कारण
शालिवाहन या राजाने हूणांचा पराभव करून शोलिवाहन या शकास सुरवात केली. तो दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा होता. या शकाचा आरंभ म्हणजे गुढीपाडवा हा सण. शक सुरु करणारा पहिला राजा महाराष्ट्रीयन म्हणून आजही शालिवाहन राजाचे नाव घेतले जाते. शालिवाहन राजाने मातीचे सैन्य तयार केले, त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला. मग या सैन्यांच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला, अशी आख्यायिका आहे. या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शके सुरु होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी पंचाग वाचन करून आणि देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे.
या दिवशी भगवान श्रीरामाचा विजय दिन म्हणूनही ओळखला जातो. प्रभू श्रीरामाने रावणावर विजय मिळवून प्रभू श्रीराम हे अयोध्येत परतले. ज्या दिवशी प्रभू राम अयोध्येत परतले, तो दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला होता. प्रभू श्रीरामाचं अयोध्येत आगमन झालं तेव्हा आनंद साजरा करण्यासाठी लोकांनी आपापल्या घरांवर ध्वज फडकावला होता. म्हणून आजही या मुहूर्तावर गुढीपाडवा साजरा केला जातो, असं म्हटलं जातं.
पौराणिक कथेनुसार, चैत्र शुद्ध प्रतिपदा या मुहूर्ताच्या दिवशी भगवान विष्णूंनी मत्सावतार धारण करुन पृथ्वीला जलप्रलायातून वाचवलं होतं. दुसऱ्या कथेनुसार याच दिवशी प्रभू श्रीराम भक्त हनुमानाने सुर्याला ग्रहणापासून मुक्त केलं होतं.
महत्वाच्या बातम्या-
-आढळराव पाटलांना सर्वाधिक मताधिक्य जुन्नरमधून मिळेल! आमदार बेनकेंनी सांगितलं राजकीय गणित
-मोहोळांसाठी कसब्यात भाजपची मोर्चेबांधणी, ५० हजारांचे मताधिक्य देण्याचा रासनेंनी व्यक्त केला निर्धार
-पुण्यात भाजपचा विक्रम! एका दिवसात दहा लाख मतदारांपर्यंत पोहोचला ‘मोदींचा नमस्कार’
-सुप्रिया सुळेंना पाठिंबा न देणं मंगलदास बांदलांना पडलं महागात; वंचितकडून शिरुरची उमेदवारी रद्द
-‘आता मी घड्याळ वापरत नाही, कारण आता मोबाईलमध्ये वेळ समजते’; सुप्रिया सुळेंचा अजितदादांना खोचक टोला