पुणे : लोकसभा निवडणूक केव्हाही जाहीर होईल. राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांची जय्यत तयारी सुरु आहे. भाजपने या निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची दुसरी यादी काल (बुधवारी) जाहीर केली आहे. या यादीमध्ये महारष्ट्रातील २० नेत्यांची नावे आहेत. पुणे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे नाव जाहीर केले आहे.
पुण्याचे माजी महापौर, भाजपचे सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी दिली आहे. पुणे लोकसभेत मुरलीधर मोहोळांना उमेदवारी देऊन भाजपने पहिला डाव टाकला आहे. मात्र आता पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात काँग्रसकडून कोण तगडा उमेदवार उभा ठाकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
भाजपने पुणेकरांच्या ओळखीचा,चर्चेतला चेहरा पुणेकरांसमोर आणून पहिल्यांदा आपला उमेदवार जाहीर केला आहे. पुणे लोकसभेची जागा महायुतीकडून काँग्रेसला देण्यात आली आहे. काँग्रेसमध्ये पुणे लोकसभेसाठी आमदार रविंद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी आणि शहराध्यक्ष अरविंद शिंदे हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.
भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसबा मतदारसंघात रविंद्र धंगेकरांनी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत बाजी मारत कसबा काबीज केला. त्यामुळे काँग्रेसकडून लोकसभेसाठी देखील रविंद्र धंगेकरांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. पुणे विधानसभेत पुणेकरांनी धंगेकर यांना साथ दिली. याच साथीच्या आणि शहरात चांगली प्रतिमा विस्तार करुन दांडगा जनसंपर्क केल्याच्या जोरावर काँग्रेस मतदारांना साकडं घालण्याच्या तयारीत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-आता वेल्हे तालुक्याचं नाव ‘राजगड’; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय
-मुरलीधर मोहोळांचा वसंत मोरेंना फोन; भाजपमध्ये जाणार? मोरे म्हणाले, ‘मी माझा निर्णय..’
-“हा ब्रह्मराक्षस आम्हीच तयार केलाय, आता या रावणाविरोधात लढणारा बिभीषण मी आहे”