पुणे : पुणे मोटार वाहन निरीक्षक, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि इतर ठिकाणचे मुख्य आरटीओ या सर्व पदांच्या नियुक्तीचे गुरुवारी (दि. ०६) आदेश निघाले आहेत. पुण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी (प्र.) (मुख्य आरटीओ) संजीव भोर यांच्या बदली होणार असल्याचे आदेश शुक्रवारी निघाले आहेत. २ नावे या स्पर्धेत असून, विविध पातळीवर पुणे आरटीओ पद मिळवण्यासाठी फिल्डींग लावली जात असल्याची चर्चा शुक्रवारी ऐकायला मिळाली आहे.
पुण्यातील मुख्य आरटीओ पदासाठीचे अध्यादेश रात्री उशिरापर्यंत निघालेले नव्हते. क्रीम पोस्टिंगसाठी जोरदार फिल्डींग लागली असून कोण बाजी मारणार याबद्दल आरटीओ वर्तुळात उत्सुकता आहे. शुक्रवारी उशिरा रात्रीपर्यंत पुणे आरटीओपदी कोणाचीही नियुक्ती करण्यात आली नव्हती. त्यामुळे परिवहन आयुक्त कार्यालयाकडून पुणे आरटीओ कार्यालयाचा तात्पुरता कार्यभार सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुजित डोंगरजाळ यांच्याकडे देण्यात आला आहे.
पुणे आरटीओ कार्यालयातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हे पद गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त होते. मात्र, शुक्रवारी परिवहन विभागाने या पदावर स्वप्निल भोसले यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-महाराष्ट्रात प्रथमच महिलांच्या हस्ते लाल महालात ३५० वा शिवराज्याभिषेक दीन साजरा
-ठरलं तर! नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी होणार विराजमान
-“‘त्या’ दडपशाहीला मतदारांनी नाकारले”; लोकसभा निकालनंतर सु्प्रिया सुळेंचा महायुतीवर निशाणा
-बारामतीच्या पराभवाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, ‘चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्यामुळेच…’
-शुभेच्छा लोकसभेच्या अन् तयारी विधानसभेची, पर्वतीत भिमालेंनी ‘टायमिंग’ साधला