पुणे : पुणे जिल्ह्यातील बारामती, मावळ, पुणे आणि शिरुर लोकसभा निवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे येथे दाखल झाले आहेत. यावेळी नरेंद्र मोदी यांना पुणेरी ‘दिग्विजय पगडी’ घालून त्यांचे स्वागत केले आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी यांचा सत्कार करण्यासाठी महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराचांची प्रतिमा भेट देण्यात आली. यावेळी मुरलीधर मोहोळांचा मोठेपणा पुन्हा एकदा पहायला मिळाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना छत्रपतींची प्रतिमा देताना सर्व महायुतीचे उमेदवार त्या जागी होते मात्र बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार या लांब उभ्या होत्या. तितक्यात मुरलीधर मोहोळ यांनी पंतप्रधानांना महाराजांची प्रतिमा देताना त्यांच्या लक्षात आले की सुनेत्रा पवार या तिथे नाहीत म्हणून मोहोळ चटकन थांबले आणि सुनेत्रा पवारांना पुढे बोलावून मग पंतप्रधानांच्या हाती महाराजांची प्रतिमा दिली.
ऐतिहासिक क्षण… 🙏🏽🙏🏽🙏🏽#PrathamSevakInPune #punewithmodi #MurlidharMohol4Pune #pmmodiinpune #NaMoAgain2024 #NaMoInPune #AbkiBaar400Paar@narendramodi pic.twitter.com/NIWO3gVBmT
— Murlidhar Mohol (Modi Ka Parivar) (@mohol_murlidhar) April 29, 2024
मुरलीधर मोहोळ, सुनेत्रा पवार आणि श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, मुरलीधर मोहोळ यांच्या या प्रसंगामुळे मुरलीधर मोहोळांचा मोठेपणा पुन्हा एकदा दिसून आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पंतप्रधान मोदींचा पहिल्यांदाच पुणे मुक्काम; राजभवनाला छावणीचं स्वरुप
-Summer Food : उन्हाळ्यात आरोग्यासाठी ‘हे’ पदार्थ पचायला उत्तम! आजच आहारात करा समावेश!
-“पंतप्रधान मोदींची सभा जय्यत होणार, प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून साधारण ५० हजार लोक सभेला येणार”