पुणे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला चांगलाच रंग चढला आहे. राज्यातील सर्वात चर्चेत असणाऱ्या शिरुर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यात पुन्हा एकदा लढत होणार आहे. अमोल कोल्हे हे २०१९च्या लोकसभा निवडणुकीत निवडून आले आणि खासदार झाले. आता शिरुरच्या मतदारांनी जागृत होत अमोल कोल्हे यांच्या विरोधात बॅनरबाजी केल्याचं दिसून आलंं आहे. आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात बॅनरच्या माध्यमातून अमोल कोल्हे यांना प्रश्न विचारण्यात आले आहे.
अमोल कोल्हे यांचा खासदार झाल्यानंतर मतदारसंघात जनतेशी संपर्क राहिला नाही. त्यात आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आंबेगाव तालुक्यात आदिवासी भागात प्रचार दौरा सुरु केला. या वेळी या भागात अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघात संपर्क नसल्यामुळे मतदारांकडून बॅनरबाजी करत खासदार कोल्हेंना प्रश्न विचारले आहेत.
बॅनरच्या माध्यमातून काय प्रश्न विचारले?
दरम्यान, शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे निवडणुकीत पुन्हा आमनेसामने आले आहेत. दोन्ही उमेदवारांनी आपल्या प्रचाराची सुरूवात केली आहे. मात्र ‘गेल्या पाच वर्षात अमोल कोल्हे मतदारसंघात फिरकले नाहीत, अन् आता प्रचारासाठी मतदारसंघात येत आहेत’, अशी नाराजी आता लोकसभा मतदारसंघात नागरिकांकडून दिसू लागली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-वडगावशेरीत मुळीक-मोहोळ-टिंगरे अन् पठारे एकाच मंचावर; महायुतीच्या मेळाव्यात महाविजयाचा निर्धार
-Aarti Singh | आरती सिंगच्या घरी सुरुय लगीनघाई! आरतीचा ‘न्यु लूक’, इन्टाग्राम पोस्टवर लाईक्सचा पाऊस
-“शिवाजी महाराजांनी पहाटे दृष्टांत दिला! आता बारामती लोकसभा लढणार”- नामदेवराव जाधव