पुणे : राज्य शासनाच्या वतीने बारामतीमध्ये आज ‘नमो महारोजगार मेळावा’ आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यसभा खासदार शरद पवार, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे यांसह इतर नेते मंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये बोलताना एकनाथ शिंदे यांनी आमचं सरकार राजकारण विरहीत असल्याचं वक्तव्य केलं आहे.
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची चांगली मैत्री होती. बाळासाहेब सांगायचे नोकऱ्या मागणाऱ्या पेक्षा नोकऱ्या देणारे व्हा. आणि आता सरकराच ते देखील करत आहे. मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेतून अनेकांना रोजगार देणारे हात निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
विभागस्तरीय नमो महारोजगार मेळावा व विविध विकासकामांचे लोकार्पण
🗓️ 02-03-2024📍बारामती https://t.co/qlfdcWMnVF
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 2, 2024
“नमो रोजगार मेळाव्यात शरद पवार, खासदार सुप्रिया सुळेदेखील मंचावर आहेत. त्यामुळे आमचं सरकार लोकाभिमुख आहे. सर्वसामान्यांचं आहे आणि राजकारण विरहीत आहे. त्याची प्रचिती नमो रोजगार मेळाव्याच्या मंचावर येत आहे. हे सरकार विकासाच्या बाबतीत आम्ही कोणतंही राजकारण आणू इच्छित नाही”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-“तरुणांना रोजगाराची गरज, राजकारण सोडून एकत्र यावं”; ‘नमो महारोजगार मेळव्या’त शरद पवारांचं वक्तव्य
-शिरुर लोकसभेत आयात केलेल्यांना उमेदवारी देणार असाल तर….; विलास लांडेंचा अजितदादांना इशारा
-Pune Metro | पुणेकरांसाठी मेट्रोचा नवा मार्ग होणार खुला; मोदींच्या हस्ते लोकर्पण