पुणे : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व पातळीवर जोमाने काम सुरु आहे. शासनाकडून अनेक सुरक्षा पथकांची नेमणूक करण्यात आली असून देखील अद्यापही महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न तसाच आहे. बदलापूर प्रकारानंतर देशभरातून अनेक प्रकरणं समोर येत आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या घटना दिवससेंदिवस वाढत असल्याचे पाहयला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर देशभरात ठोस पावले उचलली जात आहेत. आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्या बैठकीनंतर अजित पवारांनी अल्पवयीन आरोपींचं वय संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे.
माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘सध्या राज्यात बलात्काराच्या अनेक घटना घडत आहेत. त्याला आळा घालण्यासाठी कोणत्याही गुन्ह्यातील अल्पवयीन आरोपींचं वय १८ वरून आता १४ करण्याचा विचार सुरू आहे. आरोपी जर १४ वर्षांच्या आत असेल तर त्याला अल्पवयीन गृहीत धरलं जातं. पण आता यामध्ये बदल करण्याचा विचार सुरू आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे हा विषय मांडणार असून लेखी पत्र देखील देणार आहे’, असं अजित पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, आज झालेल्या बैठकीत देखील या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली तर पोलीस अधिकाऱ्यांचं देखील म्हणणं आहे की, जर या कायद्यात बदल करता आला तर तो १८ वर्षांऐवजी ते १४ वर्षे करता येऊ शकतो का? याबाबत विचार करण्यात यावा, असे देखील अजित पवार म्हणाले आहे. तर आता अजित पवारांच्या या वक्त्यव्यावर केंद्र सरकार विचार करून काही निर्णय या संदर्भात घेणार का? बालहक्क कायदा यामध्ये काही दुरुस्ती होणार का? याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“तो जिंकला पाहिजे” सुरज चव्हाण जिंकण्यासाठी पवार कुटुंबानं केलं बारामतीकरांना आवाहन
-हर्षवर्धन पाटलांचं ठरलं! ‘या’ शुभ मुहूर्तावर फुंकणार ‘तुतारी’
-प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्य महाराजांना अटक; नेमकं कारण काय?
-वडगाव शेरी विधानसभा भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक लढणार!
-बालेकिल्ल्यात अजितदादांना आणखी एक मोठा धक्का; ‘या’ नगरसेवकानं साथ सोडताच केली जहरी टीका