Vidya Balan : अनेक सिनेमांमध्ये अभिनेत्री इंटीमेट सीन करताना आपण पाहिलं आहे. तेव्हा आपली रिअक्शन असते की, या किती बिनधास्तपणे शूटींग करत आहेत. यांना काहीच कसं वाटत नाही. वगैरे वगैरे प्रश्न आपल्याला बऱ्याचदा पडतात. मात्र, अभिनेत्रींना असे सीन करताना बरेच अनुभव येत असतात. अनेकदा ते सीन पाहिल्यावर प्रेक्षकांकडून येणाऱ्या प्रतिक्रियाही अभिनेत्रींसाठी अनुभव देणाऱ्या असतात.
असे इंटीमेट सीन करताना अनेकदा अभिनेत्रींना अवघडल्यासारखं होत असतं. असाच एक अनुभव बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने सांगितला आहे. विद्याने सांगितलेला अनुभव हा अत्यंत मजेशीर आहे.
विद्या बालनने ‘फ्री प्रेस जनरल’ या चित्रपटाला दिलेल्या मुलाखतीमध्ये या चित्रपटातील रोमँटीक सीन शूट करतानाचे अनुभव सांगितले आहेत. याबाबत बोलताना, “असे इंटीमेट सीन करताना मी आधू खूप हसते. ते हसणंच मला असे सीन्स करण्यासाठी रिलॅक्स करतं. त्यामुळे मला असे सीन करताना अवघडल्यासारखं होण्यापेक्षा मी खूप हसते”, असं विद्या बालन म्हणाली आहे.
अभिनेत्री विद्या बालन ही सध्या ‘दोन और दो प्यार’ या सिनेमाचे प्रमोशन करत आहे. सिनेमामध्ये विद्या बालनसोबत प्रतीक गांधी देखील दिसणार आहे. हा चित्रपट १९ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात विद्याने प्रतीक गांधीसोबत काही इंटिमेट सीन्स केले आहेत. त्यामुळे विद्याने याबाबत भाष्य केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पाडाला पिकला आंबा!!! उन्हाळ्यात आंबा खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
-“सगळं साहेबांनी केलं, मग मी काय…”, अजित पवारांकडून बारामतीत जोरदार हल्लाबोल
-आढळराव पाटलांचे भोसरीत जोरदार शक्तिप्रदर्शन; जेसीबीतून फुले उधळत नागरिकांकडून जंगी स्वागत
-भर दो झोली! अजित पवार पोहचले धाराशिवच्या दर्गात चादर चढवायला
-गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या डीएसके कार्यालयावर ईडीकडून छापे