पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (१ फेब्रुवारी २०२५) देशाचा अर्थसंकल्प (Budget 2025) मांडत आहेत. निर्मला सीतारामन या सलग आठव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. केंद्र सरकारच्या २०२५च्या अर्थसंकल्पामध्ये काय महागणार आणि काय स्वस्त होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.
प्रधानमंत्री धन धान्य योजना
यामधील महत्वाची योजना म्हणजे ‘पंतप्रधान धन धान्य कृषी योजना’ (Prime Ministers Dhan Dhana Krishi Yojana). राज्यांच्या सहकार्याने पंतप्रधान धन धान्य कृषी योजना राबवण्यात येणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे. राज्यांच्या सहाय्याने पंतप्रधान धन धान्य कृषी योजना राबवण्यात येणार असून या योजनेत १०० जिल्ह्यांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. या योजनेचा देशातील १.७ कोटी शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना दिली आहे.
इस बजट में, प्रस्तावित विकास उपाय गरीब, युवा, अन्नदाता और नारी (GYAN) को ध्यान में रखकर दस व्यापक क्षेत्रों तक फैला हुआ है।
– श्रीमती @nsitharaman #ViksitBharatBudget2025 pic.twitter.com/9mFiO4NXk5
— BJP (@BJP4India) February 1, 2025
दरम्यान, अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी विविध योजनांची घोषणा केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ च्या भाषणात डाळींमध्ये ‘आत्मनिर्भरता’ साध्य करण्यासाठी ६ वर्षांच्या मिशनची घोषणा केली आहे. तसेच कृषी क्षेत्र आत्मनिर्भरतेकडे नेण्यासाठी फळभाजी उत्पादकांसाठी विशेष योजना राबवण्यात येणार आहे. तसेच कापसाचे उत्पादन वाढवण्यासाठी ५ वर्षांचे मिशन राबवण्यात येणार आहे.
कापसाच्या विविध जाती विकसित करणार तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कापूस उत्पादनाला जोड देण्यात येणार आहे. त्याचबरोबर किसान क्रेडीट कार्डसाठी शेतकऱ्यांना ३ लाखावरुन ५ लाख रुपये देण्यात येणार आहेत. तसेच देशात ३ नवीन युरिया प्लँट उभारण्यात येणार आहेत. यूरीया निर्मितीत आत्मनिर्भरता आणण्यासाठी नवीन प्लँट उभारण्यात येणार आहे, असेही निर्मला सीतारमन यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पीएनजी ज्वेलर्सतर्फे दगडूशेठ गणपती चरणी १ किलोचा ‘कमळ हार’ अर्पण
-पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलवरुन ८ फेब्रुवारीपासून ‘डिजीयात्रा’ सेवा!
-पुण्यात राज ठाकरे अन् एकनाथ शिंदेंची बंद दाराआड चर्चा; नेमकं काय घडलं?
-गणेश जयंतीनिमित्त कोणते रस्ते बंद, कोणते पर्यायी मार्ग, वाचा एका क्लिकवर…
-Pune GBS: धक्कादायक! टँकरच्या पाण्यात सापडले बॅक्टेरिया; पालिकेने बजावल्या नोटीसा