पुणे : पुणे शहरातील जिल्हाधिकारी पूजा खेडकर यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नियुक्ती झालेल्या ‘प्रोबेशन’ कालावधीत महिला ‘आयएएस’ अधिकाऱ्याकडून नियम धाब्यावर बसवल्याचा प्रकार आता उघडकीस आला आहे. पुजा खेडकर या आयएएस अधिकाऱ्याकडून आपल्या ‘व्हीआयपी’ नंबर असलेल्या खासगी ‘ऑडी’ गाडीला त्यांनी लाल-निळा दिवा लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता.
नव्याने प्रशासकीय सेवेत रुजू झालेल्या पूजा खेडकर यांच्या बड्या अधिकाऱ्यांनाही लाजवतील अशा मागण्या आणि ‘कारनामे’ अलीकडच्या काळात चर्चेचा विषय ठरत होते. या सगळ्या वादानंतर आता पूजा खेडकर यांची पुण्यातून उचलबांगडी करुन त्यांची बदली थेट वाशिमला करण्यात आली आहे. त्या आता वाशिमच्या जिल्हाधिकारी असतील. मात्र, यानिमित्ताने सरकारी बाबूंच्या वर्तुळात होणारी चर्चा अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
पूजा खेडकर प्रोबेशन पिरीयडवर असतानाही अधिकारी असल्याच्या थाटात राहायच्या. त्यांच्या या सगळ्या थाटाच्या सुरस चर्चा आता एक-एक करुन समोर येत आहेत. नियम सांगतो कि खासगी गाडीवर ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी लावणे अयोग्य आहे. पण पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोबेशनवर रुजू असणाऱ्या २०२२ बॅच आयएएस डॉ. पूजा खेडकर यांनी व्हीआयपी नंबर असलेल्या खासगी ऑडी गाडीला महाराष्ट्र शासन असा बोर्ड लावून घेतला, त्यांचे नावाचीही पाटी त्यांनी लावली होती.
विशेष म्हणजे या अधिकारी मॅडम त्यांच्या या गाडीचे दिवे दिवसासुद्धा चालू ठेवतात. या अधिकारी मॅडमचे ‘कार’नामे फक्त कार पुरते मर्यादित नसून वरिष्ठ अधिकारी शासकीय कामासाठी मुंबईला मंत्रालयात गेले असताना त्यांचे अँटी चेंबर बळकावून या मॅडमने चक्क वरिष्ठांच्या अँटी चेंबरचे सामान बाहेर काढून तिथे स्वतःचे कार्यालय थाटले. स्वतःच्या नावाचा बोर्डसुद्धा लावला होता, अशी माहिती समोर आली आहे. असे ‘कार’नामे करणाऱ्या आणि असे आरोप समोर आलेल्या नंतर पुणे जिल्ह्यात परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रूजू झालेल्या पूजा खेडकर यांची अखेर उचलबांगडी करून वाशिममध्ये बदली करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-वसंत मोरे आज हाती शिवबंधन बांधणार; गाड्यांचा ताफा, भगवे झेंडे घेऊन मोरेंचं जोरदार शक्तीप्रदर्शन
-मुरलीधर मोहोळांनी केलेल्या पाठपुराव्याला यश; पुणे विमानतळावरचे नवे टर्मिनल ‘या’ दिवसापासून सेवेत
-पुढील ५ दिवस राज्यात मुसळधार पाऊसाची शक्यता; पुण्यासह ‘या’ भागात रेड अलर्ट
-विधान परिषदेत अनिल परब अन् नीलम गोऱ्हेंमध्ये शाब्दिक चकमक; गोऱ्हे म्हणाल्या, ‘मी अनावधानाने…’