पुणे : पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. पुणेकरांना गेल्या काही दिवसांपासून सलग पाऊस बरसर असल्याने चाकरमान्यांची चांगलीच धांदल उडाली आहे. राज्यात पावसाने गेल्या महिन्यापासून चांगलीच हजेरी लावली आहे. पण पुणे शहरात काही दिवस विश्रांती घेऊन सोमवारपासून पुन्हा संसतधारा पावसाला सुरवात झाल्याचे पहायला मिळाले आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु असून आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांंना हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज पुण्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याने पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, शहरामध्ये पावसाची संततधार सुरु असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन काहीसे विस्कळीत झाल्याचे पहायला मिळाले. पुणे शहरामध्ये पहिल्यांदाच २४ तास संततधार पावसाने हजेरी लावली आहे. शिवाजीनगर भागात २४ तासात १५.५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-युपीएससीकडून गुन्हा दाखल झाला पण पूजा खेडकर गेल्या कुठे?
-वादग्रस्त पूजा खेडकरांचं अपंगत्वाचं प्रमाणपत्र खोटं? चौकशीतून धक्कादायक माहिती समोर
-घालीन लोटांगण, वंदीन बिहार, म्हणत अर्थसंकल्पावरुन अमोल कोल्हेंचा भाजपला खोचक टोला