पुणे : राज्यात मार्च, एप्रिलमध्ये प्रचंड कडक उन्हाळा जाणवला आहे. यंदा १ जून रोजी ते ३० सप्टेंबर या ४ महिन्यांत देशात सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. १०६ टक्के जास्त प्रमाणात वाढ होणार आहे. ‘जगभरातील स्थिती मोसमी पावसाला पोषक आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा जास्त म्हणजे १०६ टक्के मोसमी पावसाचा अंदाज आहे’, असं हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्यूंजय महापात्रा म्हणाले आहेत.
प्रशांत महासागरातील एल-निनोची स्थिती सध्या सक्रिय आहे. जूनच्या सुरवातीपर्यंत एल-निनो निष्क्रिय स्थितीत जाईल आणि ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात ला-निना सक्रिय होईल. सध्या हिंद महासागर द्विध्रुविता सध्या निष्क्रिय आहे. जूनच्या सुरुवातीस आयओडी सक्रिय होईल. युरोशियातील बर्फाच्छादित क्षेत्र मार्च-एप्रिलमध्ये सरासरीपेक्षा कमी राहिले, ही सर्व स्थिती नैऋत्य मोसमी पावसासाठी पोषक आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.
‘ला-निनाच्या काळात आजवर सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याचे निरीक्षण आहे. अपवाद वगळता ला-निना काळात नैऋत्य मोसमी पाऊस वेळेत केरळमध्ये दाखल होऊन, निर्धारीत वेळेत देशभरात पोहचतो’, असेही महापात्रा म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-Maval Lok Sabha | “माझ्या बोलण्याचा गैरअर्थ काढू नका, समोर कोण उमेदवार..”- श्रीरंग बारणे
-डोक्यावर रखरखते ऊन तरीही सुनेत्रा पवारांचा प्रचार सुरू! धायरीत महिलांनी केलं जंगी स्वागत
-“कोल्हेंवर टीका करणं हे दुर्दैवी, वैयक्तिकरित्या टीका करणे हा लोकशाहीत..”- सुप्रिया सुळे