बारामती : राज्यातील जनतेने महाविकास आघाडीच्या बाजून कौल दिला आहे. राज्यातील हॉट्सपॉट असलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी दीड लाखापेक्षा जास्त मताधिक्य घेत दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला मोठा फटका बसला आहे. बारामती लोकसभानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी दोन्ही गटाकडून सुरु झाली आहे.
माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आज बारमती दौऱ्यावर आहेत. गेल्या काही दिवसांपासून विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्या नावाची चर्चा आहे. युगेंद्र पवार यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी गोविंद बागेत शरद पवारांची भेट घेतली. बारामतीमध्ये शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या गोविंद बागेत ‘युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर करावी’, अशी मागणी केली आहे.
तसेच कार्यकर्त्यांनी शरद पवारांपुढे ‘आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे’, अशी आशा युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. कार्यकर्त्यांच्या या मागणीनंतर शरद पवारांची काय भूमिका असेल? आगामी विधानसभा निवडणुकीत काय रणनिती असेल? तसेच आता अजित पवार आणि युगेंद्र पवार असा काका-पुतण्याचा सामना बारामतीमध्ये पहायला मिळणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मोहोळांकडे सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्य मंत्रालयाचा कार्यभार; गडकरी, गोयल, जाधवांकडे कोणते खाते?
-मनसेच्या साईनाथ बाबर यांच्या आंदोलनात वसंत मोरेंचीच चर्चा; वाचा नेमकं काय प्रकरण?
-‘…अन् थेट मंत्रिपदाची माळ तुझ्या गळ्यात’; प्रवीण तरडेंनी मोहोळांसाठी केली खास पोस्ट
-“हे तुमच्या पचनी पडणारे नाहीच…” मंत्री मुरलीधर मोहोळांनी सुप्रिया सुळेंना सुनावलं