पुणे : पुणे शहरामध्ये ड्रग्ज विरोधात शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सुषमा अंधारे यांनी धरणे आंदोलन सुरु आहे. रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी उत्पादन शुल्क विभागावर केलेले आरोप खोटे असल्याचे म्हणत शंभूराज देसाई यांनी सुषमा अंधारे यांच्यासह रवींद्र धंगेकर यांना थेट अब्रुनुकसानीची नोटीस बजावली होती. शंभुराज देसाईंच्या नोटिसेवर देखील सुषमा अंधारे यांनी उत्तर दिले आहे.
पुणे शहराची ड्रग्जच्या विळख्यातून सुटका व्हावी यासाठी उत्पादन शुल्क कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. पुण्यातले बेकायदेशीर पब आणि बार विरोधात कारवाईची मागणी करत सुषमा अंधारे यांनी आंदोलन केले आहे. राज्य शुल्क विभागाचे मंत्री शंभुराज देसाई यांचा फोटो असलेल्या एका खोक्यावर ५० खोके असे लिहिले होते.
‘पुणे विद्येचे माहेरघर म्हटलं जाते, पण आता याच पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. पुण्यात फक्त अधिकृत २३ पब बार आहेत, ज्याच्याकडे परवाना आहे. यादी फक्त २३ बारची वाचली, मग १०० बार पब कोणाच्या आशीर्वादने चालतात हे आम्हाला माहीत आहे’, असे सुषमा अंधारे म्हणाले आहे.
‘शंभुराजे देसाई तुमच्या धमकीला घाबरत नाही, तुमच्या नोटिसा आम्ही डायपरसाठी वापरू. कुठल्या तोंडाने तुम्ही नोटिसा पाठवत आहात. नोटिसी पाठवता मग कारवाई का होत नाही,राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिकारी तुमचे लागेबांधे आहेत’ असेही सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘आम्ही अजितदादांसाठी सत्ता आणायची का? त्यांना महायुतीतून बाहेर काढा’; भाजप कार्यकर्त्यांची खदखद
-पुणेकरांनो सावधान! डासांपासून सावध रहा; शहरात सापडला झिकाचा तिसरा रुग्ण