पुणे : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे रोजी सोमवारी होणार आहे. सर्व पक्षाच्या प्रचारतोफा थंडावल्या आहेत. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने घेतलेल्या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधल्याचे पहायला मिळाले. “बारामती आम्ही १०० टक्के जिंकणार आहोत”, असा पुर्नरुच्चार करत देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
“आम्ही घर फोडत नाही आणि पक्षही फोडत नाही, फक्त संधी मिळाली तर ती सोडत नाही. नरेटिव्हने निवडणूक जिंकता येत नाही. गद्दार, खुद्दार यावर निवडणूक जिंकता येत नाही. विरोधकांकडे बोलण्यासाठी मुद्दे नाहीत, आम्ही विकासावर बोलतो. आम्ही ४५ जागा जिंकणार अशी घोषणा देणाऱ्यांना कुठल्या आम्ही ३ जागा सोडल्या ते विचारतो, पण बारामती आम्ही १०० टक्के जिंकणार आहोत. पहिल्या टप्प्यात नागपूर माझे हेड क्वार्टर होते, दुसऱ्या टप्प्यात संभाजीनगर होते, आता पुणे आहे, यानंतर मुंबई असणार आहे” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
“पंतप्रधान मोदींची शरद पवारांना ऑफर ही बातमी चुकीची आहे. ती ऑफर नाही, तर तो सल्ला आहे. शरद पवार बारामतीमध्ये हरणार आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार दोघेही डूबत्या नावेत बसायला निघालेत, त्यांचे राजकीय मनसुबे पूर्णत्वाला न्यायचे असेल तर त्यापेक्षा आमच्यासोबत या हा सल्ला मोदींनी दिला”, असे देवेंद्र फडणवीसांनी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Pune | पुणेकरांनो, दाखवा वोट केलेलं बोट अन् मिळवा सूट; स्विगीची भन्नाट ऑफर
-राज ठाकरेंचा फतवा अन् पुण्यात वातावरण पेटले! सोशल मीडियावर “आमचं ठरलंय”चा ट्रेंड; फायदा कुणाला?
-‘मी चुकलो, मला माफ करा, पण आता ती चूक…’; भर पावसात का मागितली अजितदादांनी माफी?
-‘पुण्याला सर्वोत्कृष्ट शहर बणवणार, मतदारांचा मतरूपी आशीर्वाद मला मिळेल’; मोहोळांचा विश्वास
-‘ही देशाची निवडणूक, गल्लीतला नाही तर दिल्लीतला नेता निवडायचाय!’ पुण्यातील सांगता सभेत फडणवीस बरसले