पुणे : पुणे शहरात वारंवार पाणी कपात केली जाते. आता पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. भामा आसखेड प्रकल्पाशी संबंधित सुरू असलेल्या बांधकामांमुळे शहरात गुरुवारी (२९ फेब्रुवारी) काही भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. नव्याने बांधण्यात आलेली पाईपलाईन मुख्य पाणी पुरवठ्याच्या जाळ्याला जोडणे आणि ठाकरशी टाकीवरील देखभालदुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
शुक्रवार १ मार्च रोजी सकाळच्या वेळेत पाण्याचा दाब कमी होण्याची शक्यता आहे.सर्व नागरिकांनी याची दखल घेऊन त्यानुसार सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील आदर्श नगर, कल्याणी नगर, हरिनगर, रामवाडी, शास्त्रीनगर, संपूर्ण गणेश नगर, म्हस्के वस्ती परिसर, कळस, माळवाडी, जाधव वस्ती, विशाल संकुल, विश्रांतवाडी सेक्टर ११२ अ, कस्तुरबा, टिंगरे नगर पंप ते विश्रांतवाडी चौक, जय जवान नगर, जय प्रकाशनगर, संजय पार्क,विमानतळ क्षेत्र, यमुना नगर, दिनकर पठारे वस्ती, पराशर सोसायटी, मिस्टर पार्क, ठुबे पठारे नगर या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या भागातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कालवा समितीच्या बैठकीत पुण्यात पाणीकपात न करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता भर उन्हाळ्यात पुणेकरांची पाणीकपात टळली आहे. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज कालवा समितीची बैठक घेतली. या बैठकीत धरण साखळीतील पाणी साठ्याचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर पाणीकपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पिंपरी-चिंचवड बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात चढाओढ
-‘पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी संधी हवी’; शिवाजी मानकरांनी भाजपकडे मागितली उमेदवारी
-काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा जाळला; डेक्कन पोलिसांकडून गुन्हा दाखल
-शिरुरच्या जागेवरुन आढळराव पाटलांचा युटर्न; अजितदादांची मजबूत फिल्डींग