पुणे : भर उन्हाळ्यात पुणेकरांना पाणी जपून वापराण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पुणे शहरातील विविध भागांमध्ये जलशुद्धीकरण केंद्राच देखभाल दुरुस्तीची कामे होणार आहेत. शहरात विविध कामे सुरु असल्याने पुणेकरांना गुरुवारी पाणी पुरवठा होणार नाही. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. गुरुवारी पाणी पुरवठा होणार नसून शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा पुर्ववत होण्याची शक्यता आहे, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट सांगितले आहे.
पुणे महापालिकेने बाणेर, बालेवाडी, कोथरूड, कात्रज आणि विमाननगर, वारजे, गांधी भवन, पॅनकार्ड क्लब, एसएनडीटी, कोंढवे धावडे, जुने वारजे, भामा आसखेड, लष्कर, खराडी, कोंढवा, वडगाव, नवीन व जुने होळकर जलकेंद्र या भागातील देखभाल दुरुस्तीची तसेच इलेट्रिकल, स्थापत्य अभियांत्रिकीची कामे होणार आहेत. त्यामुळे त्या-त्या जलकेंद्रांतर्गत पाणी पुरवठा गुरुवारी बंद असेल. त्यामुळे या कामांची नागरिकांनी दखल घेऊन नियोजन करावे आणि सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.
शहरात या भागात पाणीपुरवठा बंद
पाषाण, बावधन, सुस रोड, सुतारवाडी, वारजे माळवाडी, काकडे सिटी परिसर, कर्वेनगर गावठाण,गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, कोथरूड, महात्मा सोसायटी, बाणेर, बालेवाडी, करवेंगार, वारजे, सुखसागरनगर, धनकवडी, आंबेगाव पठार, संतोषनगर, जांभूळवाडी रस्ता, धनकवडी गावठाण परिसरा, तळजाई परिसर, सहकारनगर भाग १ आणि २, कात्रज, कोंढवा, खादी मशीन चौक, लोहगाव, विमाननगर, विश्रांतवाडी, येरवडा, धानोरी, खराडी, रामटेकडी, सोलापूर रोड, हडपसर गावठाण, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणेनगर, काळेपडळ, मुंढवा, केशवनगर, मांजरी, शेवाळेवाडी, कोरेगाव पार्क, फुरसुंगी आणि हडपसरचा काही भाग, भीमनगर, कोरेगाव पार्क, साडेसतरा नळी, महंमदवाडी, हांडेवाडी, फुरसुंगी, उरुळी देवाची, खडकी, पुणे कॅन्टोन्मेंट परिसर या भागाचा पाणीपुरठा बंद राहणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-आचारसंहितेचा भंग होतोय? निवडणूक आयोगाने उचलले कठोर पाऊल! अशी नोंदवू शकता तक्रार
-जेजुरीकरांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा; मोठे कारण आले समोर…
-Shirur Lok Sabha | ‘खासदारसाहेब पाच वर्षे कुठे होता?’ अमोल कोल्हेंना मतदारांचा खरमरीत सवाल
-वडगावशेरीत मुळीक-मोहोळ-टिंगरे अन् पठारे एकाच मंचावर; महायुतीच्या मेळाव्यात महाविजयाचा निर्धार