पुणे : राज्यात दुष्काळामुळे आणि कडाक्याच्या उन्हामुळे पाणी टंचाई आहे. परिणामी नागिरकही या पाणीटंचाईने हैराण झाले आहेत. पुणेकरांना सर्वात जास्त पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यातच ‘बारामती’च्या मतदारांना खूश करण्यासाठी पुणे शहराला एक महिना पुरेल एवढे पाणी ग्रामीण भागासाठी सोडण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. यामुळे पुणे शहराला पाणी कमी पडण्याची शक्यता आहे.
पुणे लोकसभेसाठी १३ मे रोजी मतदान झाल्यानंतर पुण्यात पाणीकपात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांत ६.९८ टीएमसी (२३.९५ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. कालवा समितीच्या नियोजनानुसार दौंड, पुरंदर, इंदापूर आणि बारामती तालुक्यांना पहिल्या उन्हाळी आवर्तनात ४.९ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. पण बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान होईपर्यंत या भागाला खडकवासला धरणातून नवीन मुठा उजवा कालव्याद्वारे जलसंपदा विभागाकडून पाणी देण्यात आले होते.
लोकसभा निवडणूक असल्या कारणाने पाण कपात न करण्याचा निर्णय जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यंत्री अजित पवार यांनी घेतला होता. अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली २४ फेब्रुवारी रोजी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. दौंड, पुरंदर, बारामती आणि इंदापूर या तालुक्यांसाठी उन्हाळ्यात दोन वेळा चार आणि तीन टीएमसी असे ७.४० टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता
महत्वाच्या बातम्या-
-मतदानाच्या दिवशी पुण्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त, तब्बल ५ हजार पोलीस असतील तैनात, वाचा…
-चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या; शेवटच्या टप्प्यात महायुतीचाच बोलबाला
-‘आम्ही घर, पक्ष फोडत नाही, पण संधी मिळाली तर ती सोडत नाही’- देवेंद्र फडणवीस
-Pune | पुणेकरांनो, दाखवा वोट केलेलं बोट अन् मिळवा सूट; स्विगीची भन्नाट ऑफर
-राज ठाकरेंचा फतवा अन् पुण्यात वातावरण पेटले! सोशल मीडियावर “आमचं ठरलंय”चा ट्रेंड; फायदा कुणाला?