पुणे : राज्यातील लाखो वारकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आषाढी विठुरायाची वारी. यापूर्वीच्या वारीवेळी वारकरी आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीमुळे यंदा प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. यावेळी माऊलींच्या पालखी प्रस्थानाला मर्यादित वारकऱ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानावेळी मुख्य मंदिरात प्रति दिंडी नव्वद वारकऱ्यांना प्रवेश देण्याचं निश्चित झालं आहे.
गेल्या वर्षी प्रस्थानावेळी वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली होती. त्या पार्श्वभूमीवर आळंदीत आज जिल्हा न्यायाधीश महिंद्र महाजनांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीला वारकरी संप्रदायातील प्रमुख व्यक्ती, दिंडी मालक-चालक यांसह पोलीस आणि प्रशासन उपस्थित होते.
आषाढी वारीदरम्यान यंदा प्रति दिंडी ९० वारकऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. गर्दी आणि चेंगराचेंगरी टाळण्यासाठी मानाच्या ४७ दिंड्या आणि ९ उपदिंडी अशा एकूण ५९ दिंड्यांतील वारकऱ्यांची संख्या मर्यादित असावी, असा निर्णय वारकरी संघटनेने घेतला आहे. मागील २ वर्षांत पालखी सोहळ्याला काही कारणास्तव गालबोट लागले. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून वारकरी संघटनेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-चंद्रकांत पाटलांकडून पावसाळापूर्व कामांचा आढावा; ‘ही’ कामे पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना
-अजित पवारांना मोठा धक्का; ‘या’ बड्या मंत्र्याचे शरद पवार गटात होणार कम बॅक?
-पालिका आयुक्त अॅक्शन मोडमध्ये; या कर्मचाऱ्यांना दिला सज्जड दम, वाचा काय नेमकं प्रकरण
-विशाल अग्रवालच्या अडचणी वाढल्या; महाबळेश्वरमधील ‘त्या’ पंचतारांकित हॉटेलवर चालवला जेसीबी