पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर आता आचारसंहिता संपली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आचारसंहितेचे कारण देऊन शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्याकडे केली असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. यावर शरद पवार बोलताना म्हणाले की, “२ दिवस थांबा सगळं सरळ करु.”
केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सरकार स्थापन झाले आहेत. यावरही शरद पवारांनी सडकून टीका केली आहे. केंद्रात स्थापन झालेल्या सरकारबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले, “चंद्राबाबू नायडू आणि नितिश कुमार नसते तर यांचे सरकार बनले नसते. डोक्यात हवा गेली अणि पाय जमिनीवर राहिले नाहीत की, या देशातील जनता योग्य वेळी योग्य निर्णय घेते हे लोकांनी दाखवून दिले आहे.” शरद पवार यांनी वाल्हे गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला.
“माझ्यासह सोनिया गांधी आणि इतर मित्रपक्षांनी ठरवलं आहे, की लोकांसाठी एकत्र काम करायचे आहे. आता जो पाऊस पडतोय तो अपुरा आहे. त्याने प्रश्न सुटत नाही. या भागासाठी गुंजवणी पाणीपुरवठा योजना पुर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकारने निधी द्यावा. या प्रकल्पाची सुरुवात माझ्या सहीने झाली आहे. पण पुढे कालव्यांची कामे झाली नाहीत. मी हा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांसोबत बैठक घेण्यास तयार आहे. ही बैठक पुण्यात होईल किंवा मुख्यमंत्री म्हणतील तिथे मी जायला तयार आहे”, असे शरद पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-ट्रॅव्हल्समुळे हडपसरमध्ये वाहतूक कोंडी; आमदार तुपे उतरले रस्त्यावर
-‘एकच मुलगी असलेल्या बापाला अनेक गोष्टी…’; शरद पवारांचं बारामतीत मोठं वक्तव्य
-“तुम्ही नगरसेवक नसतानाही केलेलं काम…” सत्यजीत तांबेंची मोहोळांसाठी ‘खास’ पोस्ट
-शिरूरमध्ये महाविकास आघाडीत वादाची ठिणगी; अमोल कोल्हेंच्या ‘त्या’ वक्तव्याने मोठा वाद