पुणे : पुणे शहरात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारीचे धक्कादायक प्रकार समोर येत असून शहराची प्रतिमा मलिन होत आहे. दहशतवाद माजवणाऱ्या टोळ्या, कोयता गँग, महिला अत्याचार, अपहरण, खून, चोरी, अमली पदार्थांची खरेदी विक्री असे गुन्हे घडतच आहेत. देशातीलच नाही तर जगातील सर्वात मोठे ड्रग्जचा साठा पुण्यात सापडला. त्यानंतर आता फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण राज्याला हादरुन सोडणारी घटना स्वारगेट बसस्थानकावर घडली. एका २६ वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये भल्या पहाटे लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली तर राज्याच्या राजकारणात देखील या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटल्याचे पहायला मिळाले. यावरुन पुणे शहरात महिला सुरक्षित नाहीत अशी भावना सर्व स्तरातून व्यक्त करण्यात आली.
स्वारगेट अत्याचार प्रकरणानंतर शहरात आता आणखी एका घटनेनं पुणे हादरले आहे. शाळेत जाण्यासाठी निघालेल्या चौथीतील मुलीवर २७ वर्षांच्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुण्यातील वाघोली परिसरात घडली आहे. या प्रकरणातील आरोपीला वाघोली पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे वाघोली परिसरात खळबळ उडाली आहे. खाऊच्या आमिषाने नराधमाने चौथीच्या विद्यार्थ्यानीसोबत घृणास्पद कृत्य केल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, इयत्ता चौथीमध्ये शिक्षण घेणारी मुलगी सोमवारी सकाळी ७-८ वाजताच्या सुमारास घरातून शाळेत जाण्यासाठी निघाली होती. शाळेत जाण्याच्या रस्त्यावर एक पिठाची गिरण आहे, त्या पिठाच्या गिरणीत कामाला असलेल्या २७ वर्षीय आरोपीने तिला अडवलं आणि तुला खाऊ देतो असं आमिष दाखवत आरोपीने पीडित मुलीला पिठाच्या गिरणीत घेऊन गेला आणि त्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. काही वेळात गिरणीपासून काही अंतरावर पीडित मुलगी रडत होती. रस्याने ये-जा करणार्या नागरिकांनी पाहिलं आणि विचारपूस केली असता तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर नागरिकांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास वाघोली पोलिस करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-Big News : छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर तेलंगणामधून अटक!
-स्वारगेट अत्याचार प्रकरणी महत्वाची अपडेट; एसटी महामंडळानं ‘त्या’ ७ बड्या अधिकाऱ्यांची केली बदली
-पुरुषांचेच व्हिडीओ करत होता शूट; मोबाईल चेक केल्यानंतर धक्कादायक सत्य आलं समोर
-‘…तर कुणाल कामराचा आबरा का डाबरा करणार’ पुण्यात शिवसैनिक आक्रमक