पुणे : सध्या दिशा सालियन प्रकरण विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये तसेच राजकीय वर्तुळात चांगलाच गाजत आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी मृत्यू प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी, अशी याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल केली आणि या प्रकरणाने पुन्हा तोंड वर काढले. या प्रकरणावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये तुफान खडाजंगी पहायला मिळाली. भाजप आणि शिंदे गटाच्या काही नेते आमदारांनी आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी केली आहे.
शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी देखील विधान परिषदेत सभागृहात याप्रकरणी भूमिका घेतली. तसेच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील काल सभागृहात याबाबत भूमिका मांडली. यावरुन आता, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेतून शिंदे गटातील महिला नेत्या आणि चित्रा वाघ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
वाघ बाईंनी काल जी भाषा वापरली त्यावर मी जाणार नाही, वाघबाई आणि किरीट सोमय्या यांचा भाजप कसा वापर करून घेत आहे ते दिसतय. वाघ बाईंनी कमी आकडा सांगितला तो कमी आहे, महाराष्ट्राची परंपरा फुले, शाहू आणि आंबेडकरांची आहे, राज्याच्या सभागृहाला मोठी परंपरा आहे. कालचा थयथयाट सभागृहाची गरिमा खाली आणणारा होता. वाघ बाई बद्दल बोलताना झोपडपट्टी बद्दल बोलू नये कारण झोपडपट्टीला सुद्धा क्लास असतो. भाजप बायकाच्या आडून नथीतुन तिर मारण्याचा प्रयत्न करत आहेत. कधीकाळी या बाई उद्धव ठाकरेंकडे पक्षप्रवेशासाठी लोळत आल्या होत्या, असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
“वाघ बाई स्वतःच्या राजकीय करियरसाठी पूजा चव्हाणसारख्या भटक्या जातीतील पोरीचं भांडवल करत होत्या. तुम्ही भटक्या जातीतील एका नेत्याचे राजकीय जीवन उध्वस्त करत आहेत. पूजा चव्हाण यांची केस पून्हा ओपन करा. आमच्या पक्षातील नेते रघुनाथ कुचिक यांचे प्रकरण चित्रा वाघ यांनी लावून धरलं होते. या प्रकरणातील पीडित तरुणीने जे खुलासे केले होते, शिवसेनेला डॅमेज करण्यासाठी मला चित्रा वाघ यांनी सांगितले होते, असं पीडित तरुणीने सांगितलं होते. मेहबूब शेख प्रकरणात देखील पीडित तरुणीला चित्रा वाघ यांनी सांगितलं होतं, तुला एफआयआरप्रमाणेचं बोलाव लागेल, माझा चित्रा वाघ यांनी व्हिडीओ देखील काढला होता, असेही पीडित तरुणीने सांगितलं आहे”, सुषमा अंधारेंनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-जयकुमार गोरेंवर विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप करणाऱ्या महिलेला अटक; नेमकं कारण काय?
-स्वारगेट प्रकरणी पीडितेचा आवाज बसबाहेर गेला?; शिवशाहीची शास्त्रोक्त पडताळणी, काय माहिती मिळाली?
-धक्कादायक! बसला लागलेली आग अपघात नव्हे तर नियोजित कट; कोणी घडवून आणला हा प्रकार?
-बारामती नगरपरिषदेतील ‘त्या’ अधिकाऱ्याला रंगे हात पकडलं; लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई