पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान येत्या ७ मे रोजी म्हणजेच उद्या मंगळवारी होणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या आहेत. प्रत्येक पक्षाने आपापल्या उमेदवाराचा शेवटच्या क्षणापर्यंत प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला आहे. अनेकांनी घरोघरी जाऊन प्रचार केला आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात रायगड, बारामती, सातारा, उस्मानाबाद, लातूर, माढा, सोलापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघामध्ये मतदान प्रकिया पार पडणार आहे.
निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभेची मतदान प्रक्रिया लक्षात घेता, मतदानाच्या दिवशी पुणे जिल्ह्यातील सर्व बाजार बंद राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने बाजार बंदचे निर्देश देण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदाना दरम्यान, पुणे जिल्ह्ययातील बारामती, पुणे, मावळ ,शिरूर लोकसभा मतदारसंघातील आठवडे बाजार बंद राहणार आहेत.
निवडणुकीची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला असून, गावांमधील सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश असल्याचं स्पष्ट केलं आहे. बाजारपेठा बंद राहणार असल्या तरीही ही चिंतेची बाब ठरणार नसून, भाजीविक्रेते आणि धान्यदुकाने मात्र ग्राहकांच्या सेवेसाठी तत्पर असतील.
महत्वाच्या बातम्या-
-श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त वाचा महत्वाचे उपदेश; जीवनात येणार नाहीत समस्या
-बापाचं पहिल्यांदा लेकीला मतदान; पक्षफुटीनंतर शरद पवार पुन्हा बारामतीतून मतदान करणार
-‘संसदरत्न पुरस्कार मिळवून बारामतीचा विकास होत नसतो’; अजितदादांचा सुप्रिया सुळेंना सणसणीत टोला