पुणे : राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ, पुणे आणि शिरुर मतदारसंघांची मतदान प्रक्रिया आता सुरु आहे. सकाळी ७ वाजेपासून ते संंध्याकाळी ६ वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया सुरु आहे. पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण किती टक्के मतदान झाले याची आकडेवारी आता समोर आली आहे.
पुणे लोकसभा
सकाळपासून दुपारी १ वाजेपर्यंत झालेलं
एकूण मतदान -२६.४८%
कसबा पेठ – ३१.१०%
कोथरूड – २९.१०%
पर्वती -२७.१४%
पुणे कॅन्टोन्मेंट – २३.२१%
शिवाजीनगर – २३.२६%
वडगाव शेरी – २४.८५%
दरम्यान, पुणेकर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भर उन्हात घराबाहेर पडले आहेत. पुणेकरांच्या मतदान केंद्राबाहेर लांब रांगा लागल्या आहेत. पुणेकरांचा मतदान करण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-वाघेरेंच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार; मतदानाच्या दिवशी गाडीवर निवडणूक चिन्ह लावून फिरले
-“कर्तव्य पार पाडल्याशिवाय अधिकार मिळत नाही” असं म्हणत सोनाली कुलकर्णीने केली जनजागृती
-७०० रुपयांचे आंबे मिळणार ३०० रुपयांत, फक्त करा मतदान; पहा पुण्यात कुठे मिळणार ही भन्नाट ऑफर