पुणे : लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीच्या कौल दिले आहे. महाविकास आघाडीतील शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने मिळून राज्यात ४८ जागांपैकी ३१ जागांवर विजय मिळवला आहे. महायुतीला अवघ्या १७ जागा मिळाल्या आहेत. राज्यात महाविकास आघाडीला मिळालेल्या यशाबाबत बोलताना अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
“महाविकास आघाडीचा हा महाराष्ट्रातील विजय म्हणजे तात्पुरती सूज आहे. हा विजय लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करून मिळवलेला विजय आहे, असे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी म्हणाले आहेत. उदय सामंत पुणे दौऱ्यावरती असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने श्रीरंग बारणे नाराजी?
केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने शिंदे गटाचे नेते नाराज आहेत. याबाबत उदय सामंत म्हणाले की, “श्रीरंग बारणे यांच्याशी अद्याप माझी कोणतीही चर्चा झालेली नाही. परंतु प्रतापराव जाधव हे ४ वेळा खासदार निवडून गेले आहेत. त्यांनी राज्यात देखील मंत्री म्हणून काम पाहिला आहे. तसेच ते तीनदा आमदार राहिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पुत्र तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने विजयी झाले असताना देखील मागची प्रथा कायम न ठेवता एका सामान्य शिवसैनिकाला शिंदे यांनी न्याय दिला आहे. त्यामूळे हीच खरी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे हे स्पष्ट होते.”
“कालची शिवसेनेची बैठक झाली त्या बैठकीमध्ये कुठेही मंत्रिपद मिळाले नाही याबाबत नाराजीचा सूर नव्हता. मी पूर्ण वेळ बैठकीला उपस्थित होतो. महाराष्ट्रामध्ये जे ७ खासदार निवडून आले आहेत हे यश काही कमी नाही. कारण आमचा स्ट्राईक रेट हा ४८% आहे. काही लोकांनी मुस्लिम आणि दलित बांधवांच्या जीवावरती जी मतं मिळवली आहे. ती त्यांना आलेली सूज आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये तशा प्रकारची रणनीती असावी याबाबत शिवसेनेच्या बैठकीमध्ये चर्चा झाली”, असे उदय सामंत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पावसाळ्यात गरम पाणी प्यायल्याने काय होते? जितके फायदे तितकेच तोटेही
-साखर सम्राटांना धक्का देण्याची तयारी, अमित शहांची भेट घेत मोहोळांनी स्वीकारला पदभार
-वाहन चालकाकडून पैसे घ्याल तर होणार ‘ही’ मोठी कारवाई; पोलीस आयुक्तांचा वाहतूक पोलिसांना इशारा
-स्मार्ट सिटी म्हणून गाजावाज केला त्याचं काय?; पुण्याच्या परिस्थितीवरुन सुप्रिया सुळे सरकारवर आक्रमक