पुणे : देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. मतदानासाठी वेगवेगळ्या प्रकारची जनजागृती केली जाते. त्यामध्ये अनेकदा मतदान करावं यासाठी पक्षाकडून वेगवेगळ्या ऑफर दिल्या जातात. भर उन्हाळ्यात यंदाच्या निवडणुकीत मतदान पार पाडण्यासाठी, जनजागृतीसाठी पुण्यात अनोखा प्रयोग करण्यात आला आहे. मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी वाढावी आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडणाऱ्या मतदारांचे कौतुक व्हावे, या हेतूने मतदान करणाऱ्या पुणेकर मतदारांना निम्म्या किमतीत ‘पॉट आईस्क्रीम’चा कप देण्यात येणार आहे.
पुणे शहरातील शिरीष ट्रेडर्स’चे संस्थापक शिरीष बोधनी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. पुणेकर मतदारांसाठी ही खास ऑफर दिली आहे. येत्या सोमवारी पुण्याचे मतदान होणार आहे. यावेळी मतदान करणाऱ्यांना भर उन्हात आईस्क्रिम खाण्याचा आनंद लुटता येणार आहे. पुण्यात प्रसिद्ध असलेले लाकडी पॉटमध्ये केलेले आईस्क्रीम हे उन्हाळ्यात आकर्षण असते. एरव्ही ६० रुपयांना विकली जाणारी आईस्क्रिम ही मतदानाच्या दिवशी अर्ध्या किमतीला म्हणजेच ३० रुपयांना मिळणार आहे.
शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या कमला नेहरू पार्क दत्त मंदिराजवळ (प्रभात रस्ता) येथे शिरीष बोधनी हा व्यवसाय करतात. त्यांचे पॉट आइसक्रीम ४० वर्षाहून अधिक काळ प्रसिद्ध आहे. मतदान करुन लोकशाहीचे कर्तव्य बजावणाऱ्या मतदारांसाठी सोमवार १३ मे रोजी मतदानाच्या दिवशी सकाळी ९ ते दुपारी १२ या कालावधीत मतदान करून आलेल्या मतदाराला आईस्क्रीम कप निम्म्या किमतीत देण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Pune Lok Sabha | शहरातील गुंडांची झाडाझडती; मतदाच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेची महत्वाची पाऊले
-“शरद पवारांनी राज्यात जातीपातीचं विष कालवलं पण, अजित पवारांना याबाबतीत…”-राज ठाकरे
-…म्हणून पाकिस्तानची भारतात बॉम्बस्फोट करण्याची हिंमत झाली नाही- देवेंद्र फडणवीस
-“पाच वर्षांपूर्वी पण अभिनय सोडतो म्हंटले पण…”; अमोल कोल्हेंच्या चुनावी जुमल्यावर आढळराव बरसले
-‘शाश्वत जीवनशैलीच्या दिशेने शाश्वत उर्जा स्त्रोतांच्या वापरावर भर’- मुरलीधर मोहोळ