पुणे : पुणे हिट अँड रन प्रकरणातील आरोपी अल्पवयीन मुलाचे वडिल प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे. या अपघात प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाल्यानंतर आता या प्रकरणाशी संबंधित आणखी एक कारवाई विशाल अग्रवालवर करण्यात आली आहे.
विशाल अग्रवाल यांचं महाबळेश्वरमध्ये एमपीजी(MPG) क्लब नावाचे एक अनधिकृत हॉटेल असल्याचे समोर आले होते. महाबळेश्वरमध्ये सरकारी जागेत हे हॉटल उभारण्यात आल्याचे समोर आल्यानंतर आता या हॉटेलवर प्रशासनाकडून हातोडा चालवण्यात आला आहे. हे हॉटेल जमीनदोस्त करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशाने प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
विशाल अग्रवालचं महाबळेश्वरमध्ये पंचतकारांकित (5 Star) हॉटेल आहे. हे हॉटेल सरकारी जागेत बांधण्यात आले आहे. सरकारी जागेवर हे हॉटेल बांधलं आहे. सरकारी जागा असताना ठराविक बांधकामाला परवानगी असताना हॉटेल उभारलं . याविरोधात नगरपालिकेत तक्रारी दाखल झाल्या, त्यानंतर अखेर या हॉटेवर आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानं प्रशासनाकडून या हॉटेलवर हातोडा चालवण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवार गटाचे आमदार मनोज जरांगेंच्या भेटीला; म्हणाले, ‘आम्ही तुमच्यासोबत’
-पुणे हिट अँन रन: रक्ताचे नमुने बदलण्याचा सल्ला कोणी दिला? धक्कादायक माहिती समोर
-Baramati | विजयानंतर सुप्रिया सुळे अजितदादांंच्या निवासस्थानी; म्हणाल्या…
-‘कोकणात जाऊन काही लोक…’; वसंत मोरेंचा मनसेला खोचक टोला
-कोण होणार पुण्याचा आरटीओ? ‘या’ दोघांच्या नावाची होतेय जोरदार चर्चा