पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघाताचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. या अपघातामध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न झाले. हे प्रकरण चांगलेच चिघळल्याचे पाहता प्रशासनाकडून या प्रकरणातील सर्व दोषींवर कारवाई व्हावी यासाठी कसून चौकशी सुरु केली आहे. या पुणे हिट अँड रन प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे होते आहेत.
अल्पवयीन आरोपी मुलाचे वडिल बिल्डर विशाल अग्रवालने डॉ. अजय तावरेला तब्बल १४ फोन कॉल केल्याची माहिती आता पोलिसांना मिळाली आहे. अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने घेत आसताना डॉ. अजय तावरे २ तासात तब्बल १४ वेळा विशाल अग्रवालशी फोनवर संपर्क साधला होता, असे पोलिसांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे कोणाला संशय येऊ नये म्हणून व्हॉट्सअॅप कॉल केले होते. या अपघात प्रकरणामध्ये ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी ब्लड रिपोर्ट बदलल्यामुळे हॉस्पिटलची चांगलीच अब्रु निघाली आहे.
हा ब्लड रिपोर्ट बदलण्याचा सल्ला डॉ. तावरेंनीच आरोपी मुलाला दिला असल्याचे विशाल अग्रवालने सांगितले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे यांनी अल्पवयीन मुलाच्या ब्लड सॅम्पल संकलनावेळी सुमारे २ तासांत १४ वेळा अल्पवयीन मुलाच्या वडिलांशी फोनवर बोलले होते. दोघांचे संभाषण झाल्याचे ‘सीडीआर’ (कॉल डिटेल रेकॉर्ड) वरून समोर आले आहे. ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी दोन्ही डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. रिमांडची मागणी करताना न्यायालयाने याबाबतची माहिती न्यायालयाला दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पोलीस कारवाईचा बार मालकांनी घेतला धसका, “आता टेबलवर ग्राहकांना दिला जातोय….”
-मलायका आरोराच्या ‘त्या’ कृत्यामुळे सर्वत्र होतंय कौतुक; सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल
-कल्याणीनगर अपघाताच्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रम; ‘माझ्या समोर ती मुलगी हवेत उडाली अन्…’