पुणे : लोकसभा निवडणुकीमध्ये यंदा राज्यात सर्वात लक्षवेधी लढत होणार ती म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाची. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खासदार सुप्रिया सुळे या निवडणूक लढणार आहेत. त्यांच्याविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणार उतरणार आहेत. या लढतीमध्ये नणंद-भावजईमधील हा सामना असल्याने आधीच सर्वांचं लक्ष लागून आहे. मात्र शिवसेनेचे नेते विजय शिवतारे हे अजित पवारांचे कट्टर विरोधक असून त्यांनी या निवडणुकीत पवारांविरोधात दंड थोपटल्याने नवा ट्वीस्ट आला आहे.
बारामतीची ही जागा अजित पवारांसाठी राखीव आहे. महायुतीकडून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळणार आहे. शिवतारे देखील महायुतीमध्येच आहेत. त्यामुळे महायुतीकडून शिवतारेंना उमेदवारी मिळणं आता शक्य नसल्याने शिवतारे हे पक्ष सोडण्याचा भूमिकेत आहेत. याबाबत त्यांनी एका वाहिनीशी बातचीत केली आहे.
विजय शिवतारे शिवसेनेतून बाहेर पडणार का?, असा प्रश्न विचारताच शिवतारे म्हणाले की, “माझं एकनाथ शिंदे यांचं घनिष्ठ नातं आहे. दोन-चार महिने त्यांची अडचण झाली आहे. मला तर लोकसभा निवडणूक लढायचीच आहे. महायुतीत आपल्याला जागा तर सुटणार नाही. त्यांना अडचण आहे म्हणून मी बाहेर पडतोय… २५ वर्षाची सोबत आहे ती असणार आहे ना… मी लोकसभेत विजयी होणार हे दैदिप्यमान यश असेल”, असं विजय शिवतारे म्हणाले आहेत.
“माझ्यावर कारवाई होणार अशी चर्चा होती. बातम्या होत्या. बघू ना काय होतं ते. कपोकल्पित विषयावर बोलणं योग्य नाही. मी लोकसभेला उभा राहणार आणि विजयी देखील होणार. आज हर्षवर्धन पाटलांना भेटणार आहे. शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवावी आणि जिंकावी. महायुतीत मी विनंती केली आहे. मुख्यमंत्र्यांनी जागा सोडवून घेतली तर मला आनंद होईल”, असं विजय शिवतारे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-“माहेरवाशीणची नेहमी खणा-नारळाने ओटी भरतो, आता आपल्याला मुलीचा मान ठेवायचाय”
-निवडणूक जिंकण्यासाठी मोदी सरकारचा रडीचा डाव, हीच का ती लोकशाही?; पृथ्वीराज चव्हाण आक्रमक
-“माझ्या विरोधात प्रीतम मुंडे असो की पंकजा मुंडे, पक्षाने सांगितलं तर लढणार अन् जिंकणार”
-Baramati Lok Sabha: लेकीसाठी ‘बापमाणूस’ मैदानात; कार्यकर्त्याने बनवली चक्क चांदीची टोपी