बारामती : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर राजकीय विरोधक शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बारामतीमधून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. शिवतारे आणि अजित पवार हे दोन्ही बडे नेते महायुतीमध्ये आहेत. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या महायुतीकडून सुनेत्रा पवार या निवडणूक लढणार आहेत. तर महाविकास आघाडीकडून सुनेत्रा पवारांच्या विरोधात सुप्रिया सुळे निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत.
पवार विरुद्ध पवार अशा या दुहेरी लढतीमध्ये आता विजय शिवतारेंनी उडी घेतली आहे. शिवतारे हे बारामती मतदारसंघात दौरे करत आहेत. कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवत आहेत. त्यातच आता शिवतारेंनी पवारांच्या काटेवाडीजवळील कन्हेरी येथील मारुती मंदिरामध्ये दर्शन घेऊन नारळ वाढवला आहे.
कन्हेरीतील मारुतीच्या चरणी नतमस्तक होऊन विजय शिवतारेंनी प्रचाराचा श्रीगणेशा केला आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे देखील नेहमी कन्हेरीच्या मारुतीरायाचे दर्शन घेऊन निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात करत असतात.
“गेल्या अनेक वर्षापासून पवार आपल्या निवडणूक प्रचाराचा नारळ वाढवून कन्हेरीच्या मारुतीरायाचे दर्शन घेतात, आणि प्रचाराला सुरुवात करतात, यावेळी मी प्रचाराची सुरुवात करीत आहे. पुरंदरमध्ये खंडेरायाचे यमाईदेवीचे दर्शन घेतले आणि मोरगावला गणपतीचे दर्शन घेऊन काटेवाडी नजीक असलेल्या मारुतीचे दर्शन घेऊन माझ्या प्रचाराची सुरुवात करत आहे”, असं विजय शिवतारेंनी म्हणाले आहेत.
‘मारुती दैवत हे शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते. सर्वसामान्य जनतेसाठी मी निवडणूक लढवीत आहे. इथे आल्यानंतर मनाला बरं वाटले. या मंदिरामध्ये श्रीरामाचे आणि मारुतीचे दर्शन घेतले. सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी आहे’, असा विश्वासही यावेळी विजय शिवतारेंनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘मावळचे पुढचे खासदार श्रीरंग बारणे हेच असणार’; उदय सामंत यांचा विश्वास
-मुरलीधर मोहोळांच्या प्रचाराचा नारळ फुटला; कै. गिरीश बापटांच्या प्रतिमेला अभिवादन
-‘..तर आमदाराकी सोडावी लागेल’; अजित पवारांचा निलेश लंकेंना इशारा
-‘बारामतीचा विकास माझ्यासारखा कोणीच करू शकत नाही’; अजित पवारांची बारामतीकरांना भावनिक साद
-भाजपकडून मोहोळांना उमेदवारी जाहीर; जगदीश मुळीकांची ‘ती’ पोस्ट चर्चेत