पुणे : पुण्याच्या जिल्हाधिकारी पदावर सुहास दिवसे यांची ७ फेब्रुवारी रोजी नियुक्ती झाली आहे. त्याआधी मागील चार वर्षापासुन सुहास दिवसे पुण्यात महत्वाच्या पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे निवडणुक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल्यांसाठी जे नियम ठरवून दिले आहेत त्याचं उल्लंघन झाल्याचं सांगत दिवसे यांच्या बदली रद्द करण्याची मागणी केली आहे. दिवसे यांची बदली रद्द करावी अशी मागणी आम आदमी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि सुराज्य संघर्ष समितीचे विजय कुंभार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.
दिवसे यांच्या बदली बरोबर इतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीवर देखील कुंभार यांनी आक्षेप घेतला आहे आणि त्या विरोधात देखील निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
७ फेब्रुवारीला पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून दिवसे यांची नियुक्ती झाली .तीन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ जिल्ह्यामध्ये असलेल्या अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्यात यावी असा नियम निवडणूक आयोगाने घालून दिला आहे. दिवसे यांच्या बदलीने या नियमाचा भंग झाला आहे. किंवा निवडणूक आयोगाचा नियम डावलून दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यातच दिवसे यांची जिल्हाधिकारी पदावर झाल्याने तेच जिल्ह्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलांचे काय निकष आयोगाने घालून दिले आहेत ते असे 21 डिसेंबर 2023 रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला पत्र लिहून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलण्याचे निकष ठरवून दिले असल्याचं विजय कुंभार यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-गाडीवरुन फटफट करत जाणं बुलेटस्वारांना भोवलं; पुणे वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई
-“आता फक्त एकच दादा ते म्हणजे…” वागळेंच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
-राज ठाकरे ‘इतिहास संशोधक मंडळा’त पोहचले अन् दिली ‘ही’ मोठी देणगी
-पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन; देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी
-“देशाच्या सर्वोच्च नेत्यांना अतिशय खालच्या स्तरावर जाऊन बोलणं हे देखील अत्यंत चुकीचं”