मुंबई | पुणे : नुकत्याच विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात होते. १२ पैकी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने पाठिंबा दिलेले शेकापचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला आणि महायुतीच्या सर्व उमेदवारांचा विजय झाला. त्यामुळे सर्व उमेदवार विजयी करून आणण्यासाठी महायुतीकडे संख्याबळ नसताना देखील अपक्ष आणि काँग्रेसचे आमदारांकडून झालेल्या क्रॉस वोटिंगमुळे हा विजय महायुतीसाठी सोपा झाल्याचे बोलले जाते.
या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा असलेला एकमेव उमेदवार पराभूत झाल्याने हा पराभव शरद पवार पक्षांच्या नेत्यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यातच ‘महाविकास आघाडीची मते फुटली नसती तर महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आले नसते आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला नसता’. जयंत पाटील यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीबाबत नाराजीही व्यक्त केली आहे. अशातच आता जयंत पाटील यांच्या पराभवानंतर विधानपरिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वे शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
‘महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार आहेत. ते म्हणतात, महाराष्ट्राचे सत्ता परिवर्तन मी करु शकतो. कोणाचीही सत्ता आणू शकतो. कोणाचीही सत्ता घालवू शकतो. शिवसेना भाजपचे सरकार सत्तेत आले होते. तेव्हा शरद पवारांनी फोडाफोडी केली. स्वत:कडे सत्ता येत असेल तर वाटेल ते करण्याची पवारांची तयारी असते. या राज्यातील शेतकरी कामगार पक्ष संपवण्याचे काम शरद पवारांनी केलं, असे सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री करताना उद्धव ठाकरे तुमचं ऐकतात. भाजपची साथ सोडताना उद्धव ठाकरे तुमचं ऐकतात, मग जयंत पाटलांच्या साध्या उमेदवारीसाठी त्यांनी का ऐकलं नाही. हा पवारांनी टाकलेला डाव होता. या डावामध्ये जयंत पाटलांचा बळी गेला. शरद पवारांनी जयंत पाटलांच्या पाठित खंजीर खुपसला आहे’, असा गंभीर आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-विधान परिषदेच्या निकाल जाहीर होताच राज्य मंत्रिमंडळ विस्तार; कोणत्या आमदारांनी कोणते मंत्रिपद?
-पुणे काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची मोठी यादी; विश्वजीत कदमांची बंधूसाठी फिल्डिंग?
-‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने’त महत्वाचे ५ बदल; जाणून घ्या नव्या जीआरप्रमाणे काय आहेत बदल?
-पुणेकरांनो सावधान! झिका वाढतोय, शहरात रुग्णांचा आकडा १९ वर; वाचा सर्वात जास्त धोका कोणत्या भागात?
-राज्यात पुढील ५ दिवस ‘या’ भागात सर्वाधिक पाऊस; अनेक भागात ऑरेन्ज, यलो अलर्ट जारी