मुंबई | पुणे : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान पार पडले. या विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकालही जाहीर झाला. यामध्ये पहिला गुलाल भाजपनेच उधळला आहे. पुण्याचे योगेश टिळेकर यांचा या निवडणुकीत दणदणीत विजय झाला आहे. टिळेकरांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिल्याचे पहायला मिळाले.
या विधान परिषदेच्या ११ जागांसाठीच्या निवडणुकीमध्ये १२ उमेदवार रिंगणात होते. भाजपजच्या पंकजा मुंडे आणि परिणय फुके यांनी देखील या निवडणुकीमध्ये विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा दिलेले जयंत पाटील यांना कमी मते मिळाल्याने मतदान केंद्रातून निघून गेले.
दरम्यान, अजित पवार गटातील शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर विजयी झाले आहेत. त्यामुळे आमदार फुटीची चर्चा सुरु असतानाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. या निवडणुकीत भाजपाचे पाच उमेदवार रिंगणात रिंगणात होते. त्यापैकी पाचही उमेदवारांचा विजय झाला आहे. यामध्ये पंकजा मुंडे, योगेश टीळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या-
-१४ जुलै रोजी बारामतीत होणार धमाका?, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजितदादांची बारामतीत सभा
-मोठी बातमी! अक्षय कुमार कोरोना पॉझिटिव्ह; ‘सरफिरा’ सिनेमाच्या अनेक सदसस्यांनाही कोरोनाची लागण
-धक्कादायक! पुण्यात तब्बल ४९ शाळा अनधिकृत; शिक्षण विभागाकडून कारवाई सुरु